शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
7
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
8
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
9
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
10
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
11
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
12
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
13
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
14
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
15
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
16
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
17
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
18
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
19
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
20
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली

महापालिकेत पाच उर्दू शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’

By admin | Updated: January 25, 2015 23:06 IST

नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाने शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी करण्याच्या दिशने पावले उचलली आहे. ओस पडणाच्या मार्गी

अमरावती : नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाने शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी करण्याच्या दिशने पावले उचलली आहे. ओस पडणाच्या मार्गी असलेल्या शाळांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन ‘ई-लर्निंग’ प्रणाली सुरु केली आहे. याच शृंखलेत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पाच उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये या प्रणालीचा शुुभारंभ केला जात आहे.मागील दोन वर्षांपूर्वी महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी झाली होती. ‘शिक्षक जास्त तर विद्यार्थी कमी’ अशी अवस्था होती. मात्र आयुक्त अरुण डोंगरे यांनी पदाची सूत्रे हाती ठेतल्यानंतर विकास कामांना प्राधान्य देऊच मात्र, शिक्षणाच्या सुविधांमध्ये आमुलाग्र बदल करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार आयुक्त डोंगरे यांनी शिक्षण विभागाचे शुद्धिकरण हाती घेतले. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देताना महापालिका शाळांमधील विद्यार्थी खासगी शाळांच्या स्पर्धेत कसा टिकेल, याचे नियोजन सुरु केले. मात्र महापालिका तिजोरीत ठणठणाट अशी विदारक स्थिती, कर्मचाऱ्यांच्या वेतनाची बोंबाबोंब, कंत्राटदारांची थकीत रक्कम अशा परिस्थितीत लोकसहभागातून ‘ई-लर्निंग’ सुरु करण्याचा निर्णघ घेतला. या उपक्रमासाठी काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या. पहिल्या टप्प्यात महापालिकेत पाच शाळांमध्ये ही प्रणाली सुरु करण्यात आली. यात वडाळी, विलासनगर, बुधवारा, भाजीबाजार, खरकाडीपुरा येथील शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये हसतखेळत शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरु होताच ज्या विद्यार्थ्यांना अ,ब,क,ड येत नव्हते, ते विद्यार्थी आज इंग्रजी बोलू लागले आहे. एवढेच नव्हे तर गरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थी संगणकावर बसून जगाची माहिती घेण्यात पुढे आला आहे. दोन वर्षांपूर्वीे महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी निमळविण्यासाठी शिक्षकांना दारोदार भटकावे लागत होते. मात्र ई-लर्निंग प्रणालीमुळे पालक आता विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात आणून सोडत आहेत. नव्या अद्ययावत शिक्षण प्रणालीने हा बदल झाला असून महापालिकांच्या ६६ शाळांमध्यही ‘ई-लर्निंग’ प्रणाली सुरु करण्याचा आयुक्तांचा मानस आहे. पाच उर्दू शाळांमध्ये सुरु होणाऱ्या या प्रणालीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने करारनामा करण्यात आल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)