शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अचलपुरात एकाच दिवशी २२५८ शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:14 IST

फोटो - अचलपूर १० एस ६५३८ हेक्टरवरील रबी पीक नोंदविले अचलपूर : एक दिवस ई-पीक पाहणी नोंदणी अभियानांतर्गत अचलपूर ...

फोटो - अचलपूर १० एस

६५३८ हेक्टरवरील रबी पीक नोंदविले

अचलपूर : एक दिवस ई-पीक पाहणी नोंदणी अभियानांतर्गत अचलपूर तहसील प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त राबविण्यात आलेल्या अभियानात एकाच दिवशी २२५८ शेतकऱ्यांची रबी पिकांची नोंदणी करण्यात आली. ई-पीक नोंदणी मिशन मोडवर राबविण्याकरिता एकाच दिवशी महसूल व कृषी विभागाच्या ६५ कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले आणि ६५३८ हेक्टरवरील पीकाची नोंद घेण्यात आली.

अचलूपर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत अचलपूर तालुक्यातील २० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या अ‍ॅपवर नोंदणी केली आहे. महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्टच्या सहयोगाने ई-पीक पाहणी वेगाने वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने मोबाईल अ‍ॅपवर नोंद घेण्याचा निर्णय अचलपुरात घेण्यात आला.

अचलपूर तालुक्यातील सहा महसूल मंडळांतील असदपूर, परसापूर, पथ्रोट, रासेगाव, परतवाडा या भागांतील २२५८ शेतकऱ्यांच्या शेतीवर जाऊन अधिकाऱ्यांनी त्यांच्या उपस्थितीत नोंदी घेतल्या. यात गहू, चणा, कांदा, संत्रा अशा विविध पिकांचा समावेश करण्यात आला. ‘मिशन मोड’वर काम करीत असताना तहसील व कृषी कार्यालयात प्रत्येक तीन तासांनी नोंदविलेली आकडेवारी एकत्रित करण्याकरिता एक कक्ष उभारण्यात आला होता. निवडणुकीच्या मतमोजणीला अनुरूप यंत्रणा राबवून पीक नोंदणीचा आढावा घेतला जात होता. याकरिता तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी दिवसभर विविध शेतांवर उपस्थित राहिले.

या पीक पाहणी नोंदणीकरिता तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, कृषी अधिकारी, कृषी सहायक आदींनी सक्रिय सहभाग दिला.

कोट

अद्यावत ई-पीक नोंदीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकाची शासकीय आधारभूत केंद्राच्या अनुषंगाने नोंदणी होईल. कृषी पतपुरवठा सुलभ होईल. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई मिळेल.

- मदन जाधव, तहसीलदार, अचलपूर

--