शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धूळफेक : पान मसाला, सुगंधी तंबाखूच्या मिश्रणातून गुटखा

By admin | Updated: May 31, 2015 00:17 IST

राज्य शासनाने राज्यभरात गुटखाबंदी केल्यानंतर छुप्या मार्गाने गुटखाविक्री सुरु आहे. मात्र, शासनाच्या ...

व्यावसायिकांचा नवा फंडा : प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गुटखा विक्रीअमरावती : राज्य शासनाने राज्यभरात गुटखाबंदी केल्यानंतर छुप्या मार्गाने गुटखाविक्री सुरु आहे. मात्र, शासनाच्या डोळ्यांसमोरच सर्रास पानमसाला व सुंगधीत तंबाखुची विक्री सुरु असल्यामुळे ‘त्या’ मिश्रणातून नागरिक गुटखा तयार करुन त्याचे सेवन करीत आहेत. गुटखाबंदीनंतर हा व्यावसायिकांचा गुटखाविक्रीचा नवा फंडा आहे. मात्र, याबाबत शासनच उदासिन असल्याचे दिसते. आज जागतिक तंबाखू दिनानिमित्त नागरिकांनी स्वत:च्या आरोग्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे. महाराष्ट्रात तंबाखू सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. विविध सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार यात दरवर्षी वाढ होताना आढळून येते. २०१२-२०१३ मध्ये जिल्हास्तरीय सर्वेक्षणात राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे व्यसन आढळून आले आहे. दरवर्षी जगात तब्बल ६ मिलियन नागरिकांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू होत आहे. २०३० पर्यंत हा मृत्यूचा आकडा ८ मिलियनपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तबांखूसेवन व सिगारेट ओढणाऱ्यांचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र, शौकीन मंडळी तबांखूशिवाय जगुच शकत नाहीत, अशी स्थिती होते. तबांखूसेवन कर्करोगास कारणीभूत ठरणारे आहे. तबांखू सेवनामुळे मृत्यू ओढवू शकतो, हे माहित असतानाही आबालवृध्दांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढते आहे. राज्यात गुटखाबंदी लागू होऊन दोन वर्षे ेउलटली. अन्न व औषधी प्रशासनाने या दोन वर्षात कोट्यवधींचा गुटखा जप्त करुन व्यावसायिकांवर फौजदारी कारवाई केली आहे. मात्र, शौकीन नागरिकांमुळे गुटखा व्यवसायिकांचे फावत आहेत. ही बाब समाजासाठी घातक ठरणारी आहे. तंबाखू सेवन कर्करोगास आमंत्रण देणारे आहे. तंबाखूसेवनाचा आरोग्यावर मोठा परिणाम होऊन त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी मनावर ताबा ठेवून तंबाखू सेवन बंद केले पाहिजे. हाच यावरील सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. -सी.एल. सोनकुसरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी,