शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

मोहफुले वेचताना झाले बाळंतपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 1:39 AM

मेळघाटात अशिक्षितपणामुळे अनिष्ट रूढी कायम आहेत. त्यामुळेच आधुनिक सुधारणा स्वीकारण्याकडे त्यांचा कल नसतो. अशावेळी उभ्या ठाकलेल्या संकटातून निभावल्यास कौतुक होते. असेच कौतुक चाकर्दा येथील महिलेच्या वाट्याला आले आहे.

ठळक मुद्देदगडाने ठेचली नाळ : दीड किलोमीटर चालत प्रसूता आली गावात

श्यामकांत पाण्डेय।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटात अशिक्षितपणामुळे अनिष्ट रूढी कायम आहेत. त्यामुळेच आधुनिक सुधारणा स्वीकारण्याकडे त्यांचा कल नसतो. अशावेळी उभ्या ठाकलेल्या संकटातून निभावल्यास कौतुक होते. असेच कौतुक चाकर्दा येथील महिलेच्या वाट्याला आले आहे. मोहफुले वेचताना बाळंत झालेल्या या महिलेने दगडाने ठेचून नाळ तोडली आणि तेथून दीड किमी चालत गावी आली. सर्व लसीकरणाला नकार देऊनही तिने सुदृढ बाळाला जन्म दिला, हे विशेष.धारणीपासून १४ किलोमीटर अंतरावरील चाकर्दा या गावातील दहा-बारा दिवसांपूर्वी घडलेली ही घटना आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना (बदललेले नाव) ही दोन वर्षांपासून पतीसोबत रोजगारानिमित्त आपल्या आई-वडिलांकडे माहेरी राहत होती. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ती चाकर्दा गावात परतली. तिचे हे पाचवे बाळंतपण होते आणि दिवस पूर्ण झाले असल्यामुळे तिने घरी राहावे, असा सल्ला उपसरपंच व आशा वर्कर यांनी दिले होता. तत्पूर्वी, १० एप्रिल रोजी गावातील लसीकरण शिबिरकरिता तिला बोलावण्यात आले. परंतु, ती लसीकरणासाठी आली नाही. गावापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावरील गावतलावालगत असलेल्या शेतात ती मोहाफुले वेचण्यासाठी पतीसोबत गेली होती. मोहाफुले वेचत असताना तिला प्रसूतिकळा सुरू झाल्या आणि तिने जंगलातच एका गोंडस बालिकेला जन्म दिला. या माउलीने दगडावर ठेचून नाळ कापली आणि त्याच अवस्थेत नवजाताला घेऊन ती दीड किलोमीटर पायी चालत गावात आली. तिने हा घटनाक्रम ग्रामस्थांना कथन केला.दुसरीकडे या माउलीच्या धैर्याचे कौतुकसुद्धा होऊ लागले आहे. प्रसूतीची माहिती मिळताच गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी तिच्या घरी पोहोचले. तिच्यावर आवश्यक औषधोपचार देण्यात आले.कल्पनाची प्रसूती झाल्याचे कळताच गावातील आशा वर्करसोबत जाऊन वैद्यकीय सेवा पुरविली. नवजात व प्रसूता दोन्ही तंदुरुस्त आहे.- प्रवीणा मोहोड,अंगणवाडी सेविका, चाकर्दा