शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा दुर्गावतार, दारू विक्रेत्याला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:24 IST

मायानगर परिसरातील देशी दारू दुकानावर हल्लाबोल करून महिलाशक्तीने या दुकानाला कुलूप ठोकले. शनिवारी दुपारी दोन तास चाललेल्या या ‘हाय व्होल्टेज’ आंदोलनात संत्रस्त महिला भगिनी व पुरुषांनी ....

ठळक मुद्देकुलूप ठोकले : नगरसेविकेला मारहाणीचा प्रयत्न, दुकानाबाहेर जाळपोळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मायानगर परिसरातील देशी दारू दुकानावर हल्लाबोल करून महिलाशक्तीने या दुकानाला कुलूप ठोकले. शनिवारी दुपारी दोन तास चाललेल्या या ‘हाय व्होल्टेज’ आंदोलनात संत्रस्त महिला भगिनी व पुरुषांनी कमालीची एकी दाखवीत संबंधित दुकानदारालाही चोप दिला. प्रत्युत्तरात त्यानेही महिला नगरसेविकेला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.दुकान बंद केल्यानंतर मायानगर भागातील नागरिकांनी फटाके फोडून दारूमुक्तीचा आनंद साजरा केला. युवा स्वाभिमानच्या नगरसेविका तथा विधी समितीच्या सभापती सुमती ढोके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी करण्यात आले. दारूने भरलेल्या बाटल्या दुकानासमोर फोडून आगही लावण्यात आली. अनेक दिवसांपासून बंद असलेले मायानगर येथील देशी दारूचे दुकान शुक्रवारी पुन्हा उघडण्यात आले. त्यामुळे मद्यपींचा त्रास पुन्हा सुरू झाला. या दुकानामुळे या भागातील महिलांचे जीणे हराम केले होते. सोबतच एमआयडीसीमध्ये काम करण्यास जाणाºया महिला व महाविद्यालयीन तरुणींना मद्यपींच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. हे देशी दारुचे दुकान हटवावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती.शेकडो महिलांचा सहभागदरम्यान शुक्रवारी हे दारू दुकान पूर्ववत सुरू झाल्याची माहिती नगरसेविका सुमती ढोके यांना मिळाली.त्यानुसार शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास त्या सहकारी महिला पुरुषांसह दारू दुकानावर धडकल्या. संचालकाला दुकान बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.मात्र प्रदीप गुजर या दारू दुकानमालकाने प्रत्युत्तरात दुकान बंद करण्यास साफ नकार दिल्याने महिलाशक्ती खवळली. यावेळी चांगलीच हमरीतुमरी झाली. दरम्यान दुकान मालकाला धक्काबुक्की व मारहाण करून बाहेर काढल्यानंतर संतप्त महिला, पुरुषांनी दारूचे बॉक्स व अन्य साहित्य बाहेर आणून त्याला आग लावली. त्यामुळे तणावात अधिक भर पडली. दुकान बंद करताना या देशी दारू दुकानाचा मालक प्रदीप गुजर नगरसेविका सुमती ढोके यांच्या अंगावर धावून गेला. त्यांना सळाखीने मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही तरुणांनी ढोके यांचा बचाव केला. जाळपोळ व हमरीतुमरी झाल्यानंतर या दुकानाला कुलूप लावण्यात आले. दुकान पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

फटाके फोडून दारुमुक्तीचा जल्लोषया दारू दुकानांमुळे महिला, तरुणी संत्रस्त होत्याच. मात्र, या भागातील मुला-मुलींचा विवाह संबंधातही हे दुकान अडसर ठरले होते. वैयक्तिक भांडणातही भर पडली होती. त्यामुळे हे दुकान बंद करण्याची या भागातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्यानुसार शनिवारी या दुकानाला कुलूप ठोकण्यात आल्याची प्रतिक्रिया या आंदोलनाचे नेतृत्व करणाºया सुमती ढोके यांनी दिली. ढोके व त्यांच्या सहकाºयांसह मायानगरातील नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष केला.गुजरच्या तक्रारीवरुन ढोकेंविरुद्ध गुन्हामायानगर येथील देशी दारू दुकानाचा मालक प्रदीप गुजर याचे तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी नगरसेविका सुमती ढोके यांच्यासह अन्य २० ते २५ महिला पुरुषांविरुध्द गुन्हा दाखल केला. ढोेके व अन्य जणांनी आपल्याला धक्काबुक्की केली. जिल्हाधिकाºयांची परवानगी असताना बळजबरीने दुकान बंद करण्यात आल्याची तक्रार त्याने नोंदविली. तक्रारीवरुन ढोके व अन्य जणांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, ४३५, ४२७, ४५२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राजापेठच्या ठाणेदारांनी दिली.