शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डफरीन ओव्हरलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:26 IST

जिल्हा स्त्री रुग्णालयात २०० बेडची व्यवस्था असताना दररोज ३५० ते ४०० महिला रुग्णांवर उपचार केले जात आहे. रुग्णांचा ओघ 'ओव्हरलोड' असतानाही योग्यरीत्या आरोग्यसेवा पुरविताना डॉक्टर व परिचारिकांची दमछाक होताना दिसत आहे.

ठळक मुद्देपरिचारिकांची दमछाक : आरोग्यसेवेसाठी तत्पर२०० बेड, ३९२ महिला रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात २०० बेडची व्यवस्था असताना दररोज ३५० ते ४०० महिला रुग्णांवर उपचार केले जात आहे. रुग्णांचा ओघ 'ओव्हरलोड' असतानाही योग्यरीत्या आरोग्यसेवा पुरविताना डॉक्टर व परिचारिकांची दमछाक होताना दिसत आहे.मनुष्यबळाचा अभाव असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ ५९ परिचारिका आरोग्यसेवेची धुरा सांभाळतात. जिल्हाभरातील गोरगरीब महिला प्रसूतीच्या उपचाराकरिता जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल होतात. अनेक वर्षांपासून या रुग्णालयात २०० बेडचीच व्यवस्था आहे. त्या तुलनेत महिला रुग्णांच्या प्रवेशांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात महिला रुग्ण दाखल होत असताना मनुष्यबळ तेवढाच आहे. रुग्ण अधिक व मनुष्यबळ कमी, अशी स्थिती असतानाही आरोग्य सेवा योग्यरीतीने सेवा पुरविण्यात डफरीन रुग्णालय अग्रेसर आहे. सोमवारी एकाच दिवशी ३९२, तर बुधवारी ३४३ महिलांवर डफरीन रुग्णालयात उपचार सुरू होता. त्यातच नवीन रुग्णांमध्ये ८९ महिलांची एन्ट्री झाली. दरम्यान दररोज १५ ते २० महिलांची प्रसूती होत आहे. अशा स्थितीत डॉक्टर व परिचारिका महिला रुग्णांना योग्य आरोग्यसेवा पुरवित असल्याचे दिसून येत आहे.नवीन इमारतीचे काम युद्धस्तरावरडफरीनमध्ये अधिसेविका व सहायक अधिसेविका ३ चे पद रिक्त आहे. तीन पाठ्य निर्देशिका आहेत. चिकित्सालयीन पाठ्यनिर्देशिकांची दोन्ही पदे रिक्त आहेत. बालरोग परिचारिकाची दोन पदे मंजूर आहे. त्यापैकी एकच पद भरण्यात आले. सार्वजनिक आरोग्य परिचारिकाची आठ पदे मंजूर असताना पाच पदे भरण्यात आली आहेत. अधिपरिचारिकांची ६० पदे मंजूर असताना ५९ पदे भरली आहेत. याच अधिपरिचारिकांवर आरोग्यसेवेची सर्वाधिक जबाबदारी आहे. डफरीन रुग्णालयातील वाढत्या रुग्णांची संख्या पाहता नवीन इमारतीत २०० बेडची व्यवस्था केली जाणार आहे. या नवीन इमारतीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या २०० बेडवरील महिलांच्या उपचारासाठी नवीन पदभरती होणार आहे. त्यावेळी डफरीन रुग्णालयातील सद्यस्थितीत काम करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांचा भार कमी होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.सात रुग्ण सांभाळते एक परिचारिकाडफरीन रुग्णालयात दररोज ३५० ते ४०० महिला रुग्णावर उपचार सुरु असतात. त्यामुळे सात महिला रुग्णांच्या आरोग्य सेवेची जबाबदारी एक परिचारिका सांभाळत असल्याची स्थिती आहे. प्रत्येक महिलांच्या प्रसुतीच्या उपचाराची जबाबदारी सांभाळण्यासाठी परिचारिकांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.