शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

चार्टर प्लेनच्या तांत्रिक अडचणींमुळे हृदयदान राहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:37 IST

अवयवदानाच्या प्रक्रियेत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असताना ऐनवेळी विमानसेवेतील तांत्रिक कारण समोर आले.

ठळक मुद्देखासगी हवाई वाहतूक कुचकामी : चेन्नईतील डॉक्टर तीन तास ताटकळत

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अवयवदानाच्या प्रक्रियेत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असताना ऐनवेळी विमानसेवेतील तांत्रिक कारण समोर आले. खासगी हवाई वाहतुकीच्या अतिव्यस्ततेमुळे चेन्नईतील डॉक्टर मुंबईच्या जुहू येथील हवाई तळावर तीन तास ताटकळत बसले होते. त्यांना चार्टर प्लेन उपलब्ध होऊ न शकल्याने अमरावतीपर्यंत वेळेत पोहोचले नाही. यामुळे मनोज गुप्ता यांच्या हृदयाचे दान राहून गेले.डॉ. अविनाश चौधरी यांच्या हॉस्पिटलमध्ये बे्रनडेड अवस्थेत असलेल्या मनोज गुप्ता यांचे किडणी, यकृत व हृदय दान केले जात असल्याची माहिती देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचली होती. त्या माहितीच्या आधारे डॉ. चौधरींकडे देशभरातील ४०० ते ५०० तज्ज्ञ डॉक्टरांनी संपर्क साधला. अखेर मनोज पांडे यांच्या शरीरातील किडणी ग्लोबल हॉस्पिटल, यकृत मुंबईतील ज्युपिटर हॉस्पिटल व हृदय चेन्नई येथील फार्टिस हॉस्पिटलला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. चौधरींनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. जिल्हाधिकाºयांनी चार्टर प्लेन अथॉरिटीशी चर्चा केली. बुधवारी सकाळी प्लेन उपलब्ध होईल, या अपेक्षेने चेन्नई येथील कार्डियाक सर्जरी विभागाचे प्रमुख बालकृष्ण व डॉ. मुरलीधर यांनी एका रुग्णाच्या हृदय प्रत्यारोपणाची संपूर्ण तयारी करून ठेवली होती. अमरावतीवरून हृदय घेऊन ते चेन्नईपर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी डॉ. मुरलीधर यांच्याकडे होती. ते बुधवारी सकाळी ९.३० वाजता जुहू विमानतळावर पोहोचले. काही वेळातच चार्टर प्लेनने अमरावतीला पोहोचण्याच्या बेतात असताना त्यांना ताटकळत राहावे लागले. यामध्ये तीन तास निघून गेले. मात्र, चार्टर प्लेन उपलब्ध होण्याबाबत संकेत मिळाले नाही. अखेर चार्टर प्लेन तांत्रिक कारणास्तव उपलब्ध होऊ शकत नसल्याचा संदेश त्यांना मिळाला. चेन्नईत रुग्ण प्रतीक्षा करीत आहे आणि अमरावती जाण्यासाठी प्लेनच उपलब्ध झालेले नाही, अशी त्यांच्यापुढे स्थिती होती. दुसरीकडे अमरावतीत मनोज गुप्ता यांच्या शरीरापासून किडणी व यकृत वेगळे करण्याची शस्त्रक्रिया सुरू होती. मनोज गुप्तांचे हृदयदेखील शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आले. मात्र, डॉ. मुरलीधर यांचे अमरावतीला येणे रद्द झाल्यामुळे मनोज गुप्तांचे हृदयदान होऊ शकले नाही.चेन्नईतील रुग्णास मिळाले असते जीवन४मनोज गुप्तांचे हृदय चेन्नईतील एका रुग्णाला मिळणार होते. ती व्यक्ती चांगले जीवन जगू शकली असती. मात्र, हवाई वाहतुकीच्या तांत्रिक अडचणीमुळे चेन्नईतील त्या रुग्णाच्या आशेवर पाणी फेरले.आॅर्गन ट्रान्सप्लान्टची तयारी झाली होती. मात्र, जुहूतील एअरपोर्टवर चार्टर प्लेन वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. त्यांनी लॉजिस्टिक प्रॉब्लेम असल्याचे कळविले आहे.- डॉ. मुरलीधरहार्ट सर्जन, फोर्टिस, चेन्नई.चेन्नईतील डॉक्टरांना चार्टर प्लेन वेळेत उपलब्ध झाले नाही. जीवन-मरणाच्या या खेळात ही सेवा तत्काळ मिळाल्यास अवयवदान हमखास यशस्वी होऊ शकते.- अविनाश चौधरी,किडणी तज्ज्ञ