पोलीस अधीक्षकांनी दिली भेट : पळवून नेऊन विद्यार्थिनींवर अत्याचाराचा प्रयत्न धारणी : तीन शाळकरी विद्यार्थिनींना पळवून नेऊन अत्याचाराचा प्रयत्न झाल्याने शहरातील वातावरण तापले आहे. ही घटना बुधवारी घडली. गुरूवारपासून संतप्त लोकभावनांना आवर घालण्यासाठी शुक्रवारी एसडीपीओ सेवानंद तामगाडगे यांच्या अध्यक्षतेत पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. दरम्यान शुक्रवारी एसपी लखमी गौतम यांनी धारणीला भेट देऊन त्या मुलींची येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करवून घेतली. अत्याचारग्रस्त मुली आदिवासी समाजातील असल्याने समाज संघटनांनी घटनेचा कडाडून निषेध केला. माजी आमदार केवलराम काळे यांच्या नेतृत्त्वात एसडीओ षणमुग राजन यांना आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी एसडीपीओ सेवानंद तामगाडगे आणि ठाणेदार नंदकिशोर शेळके यांनी एसडीओंना प्रकरणाची माहिती दिली.शनिवारपर्यंत कोठडीतधारणी : बुधवारी तीनही शाळकरी मुलींना जीपगाडीत बसवून जबरीने कोलकास येथे नेले. त्यांच्यावर चार युवकांनी बळजबरीचा प्रयत्न केला. याची तक्रार एका मुुलीने पोेलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली. तिघांनाही १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी पोलिसांनी घटनास्थळाच्या पाहणीसाठी तक्रारकर्त्या मुलींना नेले. यावेळी तपास अधिकारी तामगाडगे, एपीआय प्रीती ताठे व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
धारणीत जनप्रक्षोभ कायम
By admin | Updated: December 19, 2015 00:13 IST