शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंटरोडमुळे दुकानांना टाळे, उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:48 IST

शहराचा कायापालट करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिमेंटरोडमुळे शहरातील दुकानांनाच टाळे लागू लागल्याने 'विकास नको, जीवन हवे' अशा संवेदनशील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सिमेंट रस्त्याची उपयोगिता त्यामुळे ऐरणीवर आली आहे.

ठळक मुद्देमरणदायी विकास : अधिकाऱ्यांचे बळ कंपनीलाच

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहराचा कायापालट करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिमेंटरोडमुळे शहरातील दुकानांनाच टाळे लागू लागल्याने 'विकास नको, जीवन हवे' अशा संवेदनशील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सिमेंट रस्त्याची उपयोगिता त्यामुळे ऐरणीवर आली आहे.पंचवटी ते इर्विन चौकापर्यंतचे सिमेंटरोडचे काम सुरू होऊन सहा-सात महिन्यांचा कालावधी उलटला. नियोजनाचा ढिसाळ नमुना असलेले हे काम तरीही अपूर्णच आहे. एकाच बाजूचे काम पूर्ण व्हायचे असल्यामुळे दुसऱ्या बाजूचे काम पूर्ण होण्यास पुन्हा सहा महिने अलगद उलटतील. काम सुरू करताना स्थानिक व्यावसायिकांचा जराही विचार न केल्याने दुकानदारांना व्यवसाय करण्यास मुभाच उरली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संबंधितांनी वारंवार तक्रारी केल्या असतानाही त्याचा मुळीच लाभ झाला नाही. मुख्य अभियंता विवेक साळवे आणि त्यांच्या चमुचे या तमाम मुद्यांवर नियंत्रण असायलाच हवे होते; तथापि कंत्राटदाराला 'दुखविण्या'ची त्यांचीही इच्छा नसावी, अशा पद्धतीने त्यांनी सामान्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचमुळे 'विकास हवा असेल तर वेदना सहन कराव्याच लागतील', अशी असंवेदनशील प्रतिक्रिया जे.पी.एन्टरप्रायझेस या कंपनीद्वारे दिली जाते.जिल्हा स्टेडियम संकुलातील मेलडी कॅफे हे दुकान इतके चालायचे की तरुणाईच्या तेथील सततच्या गर्दीमुळे इतरांची तक्रार असायची. रस्त्याच्या कामापासून व्यवसाय ठप्प पडला. दुकान मालकाला दरमहा द्यावयाचे ३० हजार रुपये भाडे आणि चाकरांना द्यावयाचे वेतनही निघू शकत नसल्याने अखेर दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती दुकानचालक उल्हास खालखोनीकर यांनी दिली. मोठ्या वाहनांचे काच लावण्यात नावाजलेल्या आशीर्वाद ग्लास या प्रतिष्ठानात सहा महिन्यांत एकही वाहन आले नसल्याची माहिती सुनील कोलटकर यांनी दिली. सीटकव्ह आणि दुचाकी सजविण्यासाठीचे प्रतिष्ठान असलेल्या प्रगती हेल्मेटचे वैभव बैतुले म्हणाले दुकानाचे १५ हजार रुपये भाडे आणि कामाला असलेल्या कर्मचाºयांचे वेतन देणे शक्यच नाही. ९० टक्के व्यवसाय ठप्प पडलेला आहे. अखेर येथील कर्मचारी दुसºया दुकानात पाठविणे भाग पडले. याच संकुलात असलेल्या दोन दुचाकी दुरुस्ती केंद्रांमध्ये हीच स्थिती आहे.नागरिकांना दिलासा, कारवाईची मागणीजेपीई बांधकाम कंपनी करीत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे आणि कठोरा मार्गावरील लोकांना नाहक बंदिवास सुरू असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केल्यावर त्या परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या कंपनीची केवळ दंडुकेशाही सुरू असून सौजन्य काय असते, हे कंपनीच्या अभियंत्यांना आणि कर्मचाºयांना जराही ठाऊक नसल्याच्या वेदना नागरिकांनी 'लोकमत'कडे बोलून दाखविल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांकडे तक्रारी करूनही कुणीच आमची दखल घेतली नाही. शासकीय अधिकाºयांच्या बळामुळेच विकासाच्या नावावर आमचे जीवघेणे हाल सुरू असल्याचे कठोरा रोडवरील नागरिक 'लोकमत'ला सांगत होते.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी वृत्ताची दखल घेतली; तथापि सर्वच वरिष्ठ अधिकाºयांची मुंबईला बैठक असल्यामुळे मुख्यालयी कुणीच उपस्थित नाही. कारवाईबाबतचा त्यांचा निर्णय त्यांच्या आगमनानंतरच कळू शकेल.धामणगावचा रस्ता गाजलाधामणगावचा रस्ता तडे आणि भेगा गेल्यामुळे अपघातप्रवण झाला आहे. भेगांमुळे सायकलचे टायर घसरतात आणि तोल जाऊन अपघात होतो, अशी माहिती तेथील नागरिकांनी फोन करून 'लोकमत'ला दिली. यासंबंधाने त्या परिसरातील जागरूक लोकप्रतिनिधींनी गंभीर दखल घेतली. रस्त्याची पाहणीही केली. विवेक साळवे रस्त्याच्या या मुद्यावर कसे व्यक्त होतात, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.