शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 23:01 IST

धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका आॅटोचालक तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री १०.४५ च्या सुमारास सातुर्णा बसस्टॉपजवळ घडली. विजय लक्ष्मण गुर्जर (२२,रा. मायानगर) असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देतीन आरोपींना अटक सातुर्णा बसस्टॉपजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका आॅटोचालक तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री १०.४५ च्या सुमारास सातुर्णा बसस्टॉपजवळ घडली. विजय लक्ष्मण गुर्जर (२२,रा. मायानगर) असे मृताचे नाव आहे.पोलीस सूत्रानुसार, रवि ऊर्फ टिंग्या नंदेश्वर (३० रा. सातुर्णा), गोलू ऊर्फ मनोज सावंत (२७, रा. पार्वतीनगर) व दीपक शंकर मारवाडी (२४, रा. वल्लभनगर) अशी आरोपींची नावे आहेत. राजापेठ पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. विजय गुर्जर हा आॅटोचालक आहे. गुरुवारी रात्री तो मित्राच्या आॅटोने सातुर्णा स्थित एका दुकानात दारु पिण्यासाठी गेला. दारू पिऊन परत बाहेर आल्यानंतर विजय हा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रवि नंदेश्वर यांच्या दर्शन स्नॅक्स हातगाडीवर गेला, तर त्याचा मित्र आॅटो आणण्यासाठी गेला. त्यावेळी स्नॅक्सच्या गाडीवर उपस्थित असलेला नंदेश्वरचा मित्र दीपक मारवाडीला विजयचा धक्का लागला. धक्का लागल्याच्या कारणावरून विजय व दीपकचा वाद उफाळून आला. वाद विकोपाला गेल्यानंतर दीपक, रवी व गोलू या तिघांनीही विजयवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढविला. शस्त्राचे घाव विजयच्या कंबरेच्या खालच्या भागात लागल्याने तो जागीच पडला. दरम्यान त्याचा मित्र घटनास्थळी आला असता, विजय रक्तबंबाळ अवस्थेत आणि मारेकरी पलायन करताना दिसले. घटनास्थळी रक्ताचा सडा होता. या घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले. काही नागरिकांनी विजयला तत्काळ इर्विन रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी विजयला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यानंतर घटनेची माहिती जाणून घेतली व आरोपींचा तत्काळ शोध सुरु केला. याप्रकरणात मृतक विजय गुर्जरचा भाऊ अजय याने पोलिसात तक्रार नोंदविली असून याप्रकरणात पोलिसांनी तिन आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.अडीच तासांत आरोपी गजाआडघटनेच्या माहितीवरून राजापेठचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी पोलीस उपनिरीक्षक व डीबी पथकाला तात्काळ शोधकार्यासाठी पाठविले. पोलीस पथकाने तात्काळ अ‍ॅक्शन घेत आरोपींचा शोध सुरू केला. हत्येनंतर आरोपी एका दुचाकीने पसार झाले होते. पोलिसांनी रवि नंदेश्वरला रविनगर, गोलू सावंतला सायस्कोर मैदानातून, तर दीपक मारवाडीला हिंदू स्मशानभूमीजवळून अटक केली. दोन ते अडीच तासांत आरोपींना गजाआड करण्यात राजापेठ पोलिसांना यश मिळाले.