शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणाच्या मुद्यावरून दोन खात्यांत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:32 IST

जेपी एन्टरप्रायझेस या सिमेंट रोडचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने शहरात पसरविलेल्या घातक प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे आणि कारवाई करणे ...

ठळक मुद्देएकमेकांकडे बोट : प्रदूषण नियंत्रण मंडळ विरुद्ध महापालिका'जेपीई'वर कारवाई का नाही?

अमरावती : जेपी एन्टरप्रायझेस या सिमेंट रोडचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने शहरात पसरविलेल्या घातक प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे आणि कारवाई करणे या मुद्यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांच्यातच जुंपल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले.सिमेंटरोड निर्मितीदरम्यान आवश्यक तो दर्जा न पाळल्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या परिसरातील वातावरणात सिमेंटकणांचे गहिरे आच्छादन निर्माण झाले आहे. अनेक महिन्यांपासून या सिमेंटकणांचे श्वसन सुरू असल्यामुळे असंख्य लोकांना श्वसनासंबंधीचे विकार उद्भवले आहेत. संवेदनशील आणि वयस्क लोकांना या प्रदूषणाचा जीवघेणा त्रास होतो आहे.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रदूषणाच्या नियंत्रणाची गरज व्यक्त करताना घटनास्थळ महापालिका क्षेत्रात असल्यामुळे कारवाईचे क्षेत्रही त्यांचेच असल्याचे 'लोकमत'शी बोलताना सांगितले. यापूर्वीही जनरेटरच्या धुराने निर्माण केलेल्या प्रदूषणाच्या अनुषंगाने आम्ही महापालिकेला कारवाईसाठीचे पत्र लिहिले होते, असे सांगतानाच आता पुन्हा महापालिकेला संबंधितांवर कारवाई करण्यासंबंधीचे पत्र पाठविले जाईल, अशी माहितीही दिली.महापालिकेच्या पर्यावरण विभागात यासंबंधाने संपर्क साधला असता, प्रदूषण नियंत्रणाचे काम मुळात प्रदूषण नियंत्रण मंडळाचेच आहे. कारवाई त्यांनीच करायला हवी, अशी भूमिका घेतली.बांधकामाशी संबंधित कांतीलाल शहा, राजन शहा, तुषार शहा, राजेश लांबे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता विवेक साळवे, कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांच्या 'चलता है' या भूमिकेमुळे हजारो लोकांचे जिणे कठीण झाले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शासकीय आणि महापालिकेचे निमशासकीय अधिकारी कच खातात आणि लोकांच्या आरोग्याशी छळ होऊ देतात, हेच काय प्रदूषणमुक्त भारतासाठीचे प्रयत्न, असा प्रश्न निर्माण होतो.रस्ते झाडले, पाणी शिंपडले'पीडब्ल्यूडीचे काम कसे गोलमोल, अमरावती तू माया संग गोड बोल' हे वृत्त प्रकाशित केल्यावर सोमवारी कंत्राटदार कंपनीने सिमेंटरोडवर साचलेला सिमेंटचा थर काढण्यासाठी रस्ते झाडले. रस्त्यावर टँकरने पाणी शिंपडले. देखाव्यासाठी हे केले असले तरी प्रदूषण नियंत्रणाचे मूळ उपाय या कंपनीने टाळलेलेच आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यासंबंधाने काय कारवाई करते, याकडे लोकांचे लक्ष आहेच.