शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

असदपूरच्या नाण्यांची पोलीस कस्टडी संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:29 IST

राणी व्हिक्टोरिया, किंग जॉर्ज यांच्या भावमुद्रेतील चांदीच्या शिक्क्यांची पोलीस कस्टडी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये संपुष्टात आली आहे. चांदीचे १४६ व इतर धातूंचे ६८ असे २१४ पुरातन शिक्के मागील १२ हिन्यांपासून आसेगाव पोलिसांच्या कस्टडीत होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : लखोट्यातून कोषागारात होणार रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : राणी व्हिक्टोरिया, किंग जॉर्ज यांच्या भावमुद्रेतील चांदीच्या शिक्क्यांची पोलीस कस्टडी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये संपुष्टात आली आहे. चांदीचे १४६ व इतर धातूंचे ६८ असे २१४ पुरातन शिक्के मागील १२ हिन्यांपासून आसेगाव पोलिसांच्या कस्टडीत होते.अचलपूर तालुक्यातील असदपूर येथे श्रीकृष्ण केशवराव म्हाला यांच्या घरी खोदकाम चालू असताना वर्षभरापूर्वी हे २१४ शिक्के मिळाले होते. ३१ मार्च व २ एप्रिल २०१७ रोजी आढळलेले हे शिक्के तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी पुरी यांनी आसेगाव पोलीस ठाण्यात जमा केले होते. पुरातन मौल्यवान शिक्के, वस्तू मिळाल्यापासून १५ दिवसांत कोषागारात जमा करायला हवे होते. पण, तसे न करता आसेगाव पोलिसांनी ते स्वत:कडे ठेवून घेतले होते. यावर ‘लोकमत’ने ५ एप्रिलला वृत्त प्रकाशित केले होते. यात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र, जिल्हा कोषागारात ते ठेवण्याची व्यवस्था नाही. नागपूर येथील पुरातत्त्व विभागाला कळविले आहे. अद्याप निर्णय झालेला नाही, असे आसेगाव पोलिसांनी स्पष्ट केले होते.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, अचलपूर उपविभागीय अधिकाºयांना यांना यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविले आहे.या पत्राची प्रत आसेगाव पोलिसांनाही आहे. नाण्यांचा मौल्यवान लखोटा तयार करून ही नाणी अचलपूर उपकोषागारात ठेवण्याचे निर्देश या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आता राणी व्हिक्टोरिया, किंग जॉर्ज यांच्या भावमुद्रेतील चांदीच्या शिक्क्क््यांसह इतर धातूच्या पुरातन शिक्क्क््यांची लखोट्यातून आसेगाव पोलिसांना अचलपूर उपकोषागारात रवानगी करावी लागणार आहे. त्यापूर्वी जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.प्रत्येकी ११ ग्रॅमचा शिक्काइंग्रजकालीन हे शिक्के भारतीय रुपयाच्या प्रारंभीच्या काळातील आहेत. हे शिक्के १८३३ ते १९४७ दरम्यान भारतात चलनात होते. असदपूर येथे सापडलेल्या या शिक्क्क््यांवर राणी व्हिक्टोरिया, किंग जॉर्ज यांच्या भावमुद्रा आहेत. यातील एका शिक्क्क््याचे वजन ११ ग्रॅम आहे.यापूर्वीही आढळले शिक्केअचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम सुरवाडा शिवारातील पांढरी उजाड या गावातील कामात मुगलकालीन शिक्के आढळले होते. यात पांढऱ्या धातूचे ६२ व पिवळ्या धातूचे दोन शिक्के होते. सन २०१४ मध्ये मिळालेले हे शिक्के पोलिसांनी लखोट्यातून उपकोषागारात ठेवले आहेत.