शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डांबरीकरणामुळे राजापेठ धूलिकणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:23 IST

राजापेठ रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल बांधकामामुळे निर्माण झालेल्या धूलिकणांचा प्रकोप अमरावतीकरांच्या आरोग्यावर धातक परिणाम करणारा ठरत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते.

ठळक मुद्देमहापालिकेचे पाऊल : रहिवाशांसह वाहनचालकांना दिलासा

आॅनलाईन लोकमतअमरावती : राजापेठ रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल बांधकामामुळे निर्माण झालेल्या धूलिकणांचा प्रकोप अमरावतीकरांच्या आरोग्यावर धातक परिणाम करणारा ठरत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते. या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने उपाययोजनेसाठी पाऊल उचलून रस्ते खड्डेमुक्त करण्यासोबतच डांबरीकरण केल्यामुळे राजापेठ परिसरात धूलिकणमुक्त झाला आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांसह या मार्गाने ये-जा करणाºया वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.शहरातील वाढते धूलिकण अमरावतीकरांचे आयुष्यमान कमी करण्यास कारणीभूत ठरत होते. उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे पर्यायी मार्ग खड्डामय झाल्यामुळे वाहनांच्या वर्दळीमुळे धूलिकण हवेत उडत होते. या धूलिकणांमुळे श्वसन आजाराचे प्रमाण वाढल्याचेही तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रतिक्रियांमधून उघड झाले. धूलिकणांचा वाढता प्रकोप अमरावतीकरांच्या आरोग्यावर घातक परिणाम करीत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने काही दिवसांपूर्वी 'उड्डाणपुलाची डोकेदुखी' या वृत्त मालिकेतून लोकदरबारी मांडले. त्याची दखल घेत स्वीकृत नगरसेवक मिलिंद चिमोटे यांनी महापालिका सभागृहात मुद्दा मांडला होता. त्यानंतर महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या निर्देशाप्रमाणे पर्यावरण विभागाने संयुक्त बैठक बोलावून धूलिकणावरील उपाययोजनेसंदर्भात 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार केला. त्यानुसार मागील १५ दिवसांपासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच आता डांबरीकरणाच्या कामांनाही सुरुवात करण्यात आली आहे. धूलिकणांचा सर्वाधिक प्रकोप असणाºया राजापेठ चौकातील दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आल्यामुळे आता नागरिकांना धूलिकणांपासून मुक्तता मिळाली आहे. आता शहरातील अन्य ठिकाणच्या रस्त्यांचेही दुरुस्ती कामे केली जाणार आहे.