शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात दुष्काळाचं सावट १५ दिवसांत २० मिमी पाऊस; पिकांना स्प्रिंलरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 16:03 IST

अमरावती विभागात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणाऱ्या मेळघाटातही यंदा दुष्काळाचं सावट पसरलं आहे.

ठळक मुद्देअमरावती विभागात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणाऱ्या मेळघाटातही यंदा दुष्काळाचं सावट पसरलं आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यात पिकांना स्प्रिंकलरने पाणी देत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

वीरेंद्रकुमार जोगीअमरावती, दि. 19 - अमरावती विभागात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणाऱ्या मेळघाटातही यंदा दुष्काळाचं सावट पसरलं आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यात पिकांना स्प्रिंकलरने पाणी देत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.  मेळघाटात जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र यंदा पावसाने मोठी दडी दिल्यामुळे मेळघाटात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असल्याची चर्चा आहे. मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात यावेळी अंदाजे १२०० मिमी पाऊस होतो असे हवामान खात्याच्या आकड्यांवरून दिसते. मात्र यंदा पावसाने ४५० मिमीचा आकडा देखील पार केलेला नाही. मागील आठ दिवसांपासून धारणी तालुक्यात एकही थेंब पाऊस झालेला नाही. हवामान खात्याच्या अकाडेवारीनुसार १ ऑगस्ट रोजी धारणी तालुक्यात ४३० मिमी पाऊस झाला होता. १७ ऑगस्ट पर्यंत पावसाची ही आकडेवारी ४५१ मिमी पर्यंतच पोहचली आहे. मागील वर्षी १  ऑगस्ट रोजी ८२३ मिमी  व १८ ऑगस्ट रोजी १००३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.  यावरून गत वषीच्या व यंदा झालेल्या पावसात तफावत दिसून येते. 

पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस झाला, त्यावर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली. दरम्यान येणाऱ्या पावसाने शेतमाल जसातसा बचावला आहे, मात्र मागील तीन आठवड्यांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना भर पावसाळ्यात ओलीत करावे लागत आहे. विशेष म्हणजे किड रोगापासून बचाव व्हावा यासाठी पट पाणी देण्यापेक्षा शेतकरी स्प्रिंकलरचा वापर करीत आहेत. येथील आदिवासी व शेतकरी पावसाचा अंदाज प्राणी, झाडे व निसर्गात होणारा बदल यावरून लावत असतात. तरी देखील हवामान खात्याच्या अंदाजावर मागील काही वर्षात बसलेला त्यांचा विश्वास यंदा ढासळला आहे.