शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील शंभरावर गावांत स्मशानभूमीअभावी  नदी-नाल्यांकाठी होतात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 12:11 IST

Amravati News अमरावती जिल्ह्यातील जवळपास १०० हून अधिक गावांत स्मशानभूमीच नसल्याने मृताचे कुटुंबीय आणि नातेवाईक़ांना गावाबाहेरील खुल्या जागेत किंवा नदी-नाल्याकाठी मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. 

ठळक मुद्देपावसाळ्यात सर्वाधिक गैरसोय ‘गाव तेथे स्मशानभूमी’ची गरज, प्रशासनाला जाग केव्हा?

  जितेंद्र दखने    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने गाव तिथे स्मशानभूमीची संकल्पना राबिवली. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील जवळपास १०० हून अधिक गावांत स्मशानभूमीच नसल्याने मृताचे कुटुंबीय आणि नातेवाईक़ांना गावाबाहेरील खुल्या जागेत किंवा नदी-नाल्याकाठी मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. 

सर्वाधिक अडचण पावसाळयाच्या दिवसांत येते. मृताचा अंत्यविधी पार पडण्यासाठी प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून निधीदेखील मंजूर केला जातो. मृत्यूनंतर मानवी देहाची विटबंना होऊ नये, अखेरचा प्रवास सुखाचा व्हावा हीच अपेक्षा सर्वांना असते. मात्र, जिल्हाभरातील १९९७ गावांपैकी १०० हून अधिक गावांत आजही स्मशानभूमी  नसल्याने अंत्यविधीसाठी नदी-नाल्ल्याकाठी सोपस्कार पूर्ण करावा लागतो. मात्र याची दखल घेतली जात नसल्याचे बोलते जात आहे.

जनसुविधेतून विकासकामे जिल्हा परिषदेमार्फत १४ तालुक्यांतील मागील काही वर्षांत ५०० हून अधिक गावात स्मशानभूमीमध्ये  दहन, दफनभूमी, चबुतऱ्यांचे बांधकाम, पाण्याची सोय, शेडचे बांधकाम, पोचरस्ता, स्मृती उद्यान व अन्य मूलभूत सुविधा, साैंदर्यीकरणाची कामे करण्यात आली आहेत. दरवर्षी स्मशानभूमीची कामे करण्यासाठी जनसुविधा योजनेसाठी चार ते पाच कोटींचा निधी मिळतो. यामधून जिल्हाभरात कामे करण्यात आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दिलीप मानकर यांनी सांगितले.

सावरपाणी गावात जंगलात अंत्यविधी चिखलदरा तालुक्यातील सावरपाणी या आदिवासीबहुल मूळ गावांच्या पुनर्वसनानंतर त्यापूर्वीही या गावात मृतांच्या अंत्यविधीसाठी अद्यापही स्मशानभूमी नाही. आदिवासी बांधव आजही जंगलात मांडवदेव म्हूणून ओळखल्या जाणाऱ्या खुल्या जागेत अंत्यविधीचा कायर्क्रम पार पाडतात. विशेष म्हणजे स्मशानभूमीत सुविधा तर सोडाच, पायी जाण्यासाठी धड रस्ता नाही. पावसाळाचे दिवसात तर परिस्थिती अधिकच बिकट असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

एकलारा स्मशानभूमीची वानवाअंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील कोकर्डा परिसरातील एकलारा या गावातही स्मशानभूमी नसल्याने येथील गावकऱ्यांना भुलेश्वरी नदीकाठी मृतदेहावर अंत्यविधी पार पाडावे लागतात. विशेष म्हणजे पावसाळयाच्या दिवसांत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. याशिवाय याच परिसरातील चार ते पाच गावांतही स्मशानभूमी नसल्याने अशा गावांत स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून आवश्यक सुविधा निर्माण करून देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Governmentसरकार