शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पावसामुळे संत्राबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:45 IST

खरीप-रब्बी हंगामात सर्वसाधारण पिके घेत असताना, खस्ता हाल होत आहे. यातून आता संत्राउत्पादक शेतकरी सुटला नसून, मागील चार वर्षांपासून त्याची बिकट स्थिती होत आहे.

ठळक मुद्देसाडेसहा हजार झाडे उत्पादनक्षम : हिरव्या फळांची तोड

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : खरीप-रब्बी हंगामात सर्वसाधारण पिके घेत असताना, खस्ता हाल होत आहे. यातून आता संत्राउत्पादक शेतकरी सुटला नसून, मागील चार वर्षांपासून त्याची बिकट स्थिती होत आहे. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे कमी प्रमाणात फूट व नियमित पाऊस नसल्यामुळे फळाची वाढ झाली नाही तर झाडे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना चक्क हिरवी फळे तोडून फेकावी लागत आहे.दिवसेंदिवस भूजलपातळी कमी होत असल्यामुळे संत्राबागा वाचविणे कठीण होत आहे. मोर्शी तालुक्यात ११ हजार हेक्टरवर संत्राझाडे असून, यापैकी साडेसहा हजार झाडे उत्पादनक्षम असल्याचे तालुका कृषी अधिकारी योगेश संगेकर यांनी सांगितले. उर्वरित एक ते पाच वर्षाची झाडे आहेत. यापूर्वी अपुरा पाऊस झाल्याने व फळधारणा टिकून राहण्यासाठी योग्य वातावरण नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली. किंबहुना अनेक बगीचात पोषक वातावरणाअभावी मृग बहर आला नाही.सद्यस्थितीत सिंचनाची स्थिती बिकट आहे. शेतकरी झाडे वाचविण्यासाठी अनेक उपाय करत आहेत. विहिरीचे पाणी पुरत नाही. मोर्शी तालुका ड्राय झोन असल्यामुळे कूपनलिका करता येत नाही. अशा स्थितीत आडोशाला जाऊन कूपनलिका शेतकरी करीत आहेत. यामुळे विहिरीचीही पाण्याची पातळी खाली जात असल्याचे दिसून येत आहे. आसोना येथील शेतकरी दिनेश टिपरे यांना यावर्षी पोषक वातावरणाअभावी मृग बहर घेता आला नाही; उलट झाडे टिकून रहावी म्हणून खर्च होत आहे.संत्रा उत्पादक शेतकरी सधन म्हणून ओळख होती; परंतु अस्मानी सुलतानी संकटामुळे त्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ म्हणून तो झाडे वाचविण्यासाठी हिरवी फळे तोडून फेकण्याची कसरत करीत आहे.