शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेशन तांदळाच्या अवैध विक्रीचा पदार्फाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 01:07 IST

शासकीय स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध विक्रीचा गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री पदार्फाश केला. पोलिसांनी शासकीय पुरवठादार सैयद मुनोज्जर अली सैयद मुजफ्फर (४३, रा. निषाद कॉलनी) व रेशन दुकानदार रिक्की राजकुमार साहू (३१, चेतनदास बगीचा, मसानगंज) या दोघांना अटक केली.

ठळक मुद्देदोन आरोपींना अटक : ७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासकीय स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध विक्रीचा गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री पदार्फाश केला. पोलिसांनी शासकीय पुरवठादार सैयद मुनोज्जर अली सैयद मुजफ्फर (४३, रा. निषाद कॉलनी) व रेशन दुकानदार रिक्की राजकुमार साहू (३१, चेतनदास बगीचा, मसानगंज) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ७० पोत्यांतील १८ क्विंटल तांदूळ व ट्रक असा एकूण ७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शासकीय धान्याचे पुरवठादार सैयद मुनोज्जर यांचे निषाद कॉलनीत गोदाम असून, तेथून शासकीय धान्याचा विविध ठिकाणी पुरवठा केला जातो. मध्यवर्ती कारागृह, आदिवासी आश्रमशाळा अशा विविध ठिकाणी हे शासकीय धान्य पोहचविले जाते. गाडगेनगर पोलिसांना गुरुवारी रात्री येथून शासकीय धान्याची अवैध विक्री होत असल्याची माहिती हाती लागली. त्यानुसार पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गोकुल ठाकूर, डीबी पथकाचे हवालदार शेखर गेडाम, सतीश देशमुख, भारत वानखडे, विशाल वाकपांजर, रोशन वºहाडे, प्रशांत वानखडे यांच्या पथकाने धान्य गोदामावर धाड टाकली. त्यावेळी तेथे एका ट्रकमधून तांदळाचा माल उतरविला जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पोत्यातील धान्याची तपासणी केली असता, ते धान्य शासकीय असल्याचे आढळले. पोलिसांनी ट्रकसह मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३,७, ईसी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे. शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागणी पोलिसांनी केली होती.जिल्हा पुरवठा विभागाला पत्रतांदळाचा मुद्देमाल शासकीय आहे किंवा नाही, याची शहानिशा करण्यासाठी गाडगेनगर पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे कळविले. शुक्रवारी पुरवठा विभागातील त्यावर शिक्कामोर्तब केले.पोते बदलविलेशासकीय धान्याच्या पोत्यातील तांदूळ कोणाला ओळखत येऊ नये, यासाठी रेशन दुकानादाराने प्लास्टिकच्या पोत्यात तांदूळ भरला आणि त्यानंतर या शासकीय धान्याचा पुरवठा केला. पोलिसांनी घटनास्थळाहून जप्त केलेल्या मुद्देमालावरून ही बाब स्पष्ट झाली.