शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

प्रभावी आपत्ती व्यवस्थापनाअभावीच घडला पूर्णेचा महाप्रलय

By admin | Updated: August 1, 2014 00:04 IST

धरण जेवढे जीवन जगण्याला फायदेशीर ठरते तेवढेच ते मरणालाही कारणीभूत ठरु शकते याचा अनुभव पूर्णेच्या महाप्रलयाने पूर्णाकाठच्या सुमारे १५०० गावकऱ्यांना आणून दिला.

चांदूरबाजार : धरण जेवढे जीवन जगण्याला फायदेशीर ठरते तेवढेच ते मरणालाही कारणीभूत ठरु शकते याचा अनुभव पूर्णेच्या महाप्रलयाने पूर्णाकाठच्या सुमारे १५०० गावकऱ्यांना आणून दिला. या धरणाचे बुडीत क्षेत्र मध्यप्रदेशातील भैसदई येथे आहे. त्यामुळे तेथे आलेल्या पावसावर या धरणाची पातळी अवलंबून असते. तेथूनच हा विभाग वेळोवेळी माहिती घेत असतो.चांदूरबाजार तालुक्यातील विश्रोळी येथे पूर्णा मध्यम प्रकल्पाचे काम सन २००६ मध्ये पुर्ण झाले. सन २००७ मध्ये त्यात पाण्याची साठवण करण्यात आली. त्याच वर्षी मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसाने धरणाची पातळी वाढल्याने त्यावेळी पहिल्यांदाच धरणाचे सर्व ९ दरवाजे १.२० मीटर उघडण्यात आले होते. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व ९ दरवाजे उघडण्याची पाळी २७ जुलै रोजीच अली. तब्बल तीन मीटर वर दारे उघडण्याची ही या धरणाच्या इतिहासातली पहिली घटना आहे. या धरणाची पातळी संचयमर्यादा ४५२ मीटर आहे. ही पातळी ओलांडण्याची चिन्हे दिसताच धरणाची दारे उघडण्याची प्रक्रिया सुरु केली जाते. मात्र पावसाची अनियमितता लक्षात घेता वरिष्ठांच्या आदेशानुसारच पाणी सोडायचे की नाही हे ठरविण्यात येते.२७ जूलै रोजी सकाळी ८ वाजता धरणाच्या पाण्याची पाळी सामान्य होती. त्यावेळी धरण स्थळावर केवळ १ मीमी पावसाची नोंद होती. मात्र पाण्याची पातळी वाढत असल्याचे दिसताच धरणावरील कार्यरत अधिकाऱ्यांनी भैसदेई येथून माहिती घेतली असता पाणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यावेळी धरणाची संचयमर्यादा ४५०.३६ मीटर इतकी होती. त्यानंतर ८ वाजतापासून २२मी ला तहसीलदार व चांदूर बाजार पोलिसांना पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने २ पेक्षाजास्त दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याच्या सुचना देण्यात आल्या. ही सूचना अचलपूर पूरनियंत्रण कक्षालाही देण्यात आली. सकाळी ९.३६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चांदूर बाजार तहसीलदार सोबत बोलणे, ९.४० जिल्हाधिकारी कार्यालया (नो रिस्पॉन्स), ९.३९ चांदुर बाजार पोलिस स्टेशन (नो रिस्पॉन्स), ९.४५ तहसीलदार दर्यापुर, ९.४६ एसडीओ अचलपर, ९.४८ तहसीलदार भातकुली, ९.५३ पुर नियंत्रण अमरावती यांना नदीकाठच्या गावांनासतर्क करण्याचा संदेश, १०.०९ जिल्हाधिकारी अमरावती. त्यानंतर धरणाची पाच दरवाजे ५० से.मी. उघडण्यात आले. त्यावेळी धरणाची पाण्याची पाळी ४५०-६० झाली होती. त्यानंतर पाण्याची पातळी ४५१.५५ मी. झाली. त्यानंतर धरणाची ९ गेट २ मीटर उघडण्यात आली. ११.५ ला ही प्रक्रियाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाचा देण्यात आली. ११.१५ एस.डी.ओ. अचलपूर, ११.१६ भातकुली तहसीलदार त्यानंतर पातळी ४५१.४६ ला जिल्हाधिकारी अकोला यांना देण्यात आली. या प्रक्रियेत धरण प्रशासन व तहसीलदार चांदूर बाजार यांचा संपर्क सर्वाधिक झाला. तहसीलारांनी रेस्क्यू टीमची मागणी ११ वाजता केली होती. यात ही टीम ४ वाजता पोहचली. ज्या तत्परतेने पूरग्रस्तांना मदत निधी वितरण करण्यात आले त्याच तत्परतेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा राबविण्यात आली असती तर कदाचित नुकसानीचे प्रमाण घटले असते. या घटनेने काही अधिकाऱ्यांची ‘नो रिस्पॉन्स’ व ‘स्वीच आॅफ’च्या माध्यमातूनही उदासीनता चव्हाट्यावर आली आहे. या प्रकराची चौकशी होणे अगत्याचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)