शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

धान्य बाजारावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: March 8, 2015 00:05 IST

शेतकऱ्यांना झालेले अल्प उत्पन्न, वाढलेला वाहतूक खर्च त्यामुळे शेतकरी खर्चापूरतेच धान्य बाजारात विक्रीकरिता आणत आहेत.

अमरावती : बँंकेचे कर्ज एकरकमी परत द्यावे लागत असल्याने आता बहुतांश शेतकरी शेती हंगामासाठी बचत गटातून कर्ज घेत आहेत. त्यामुळे बचत गट शेतकऱ्यांचा आधार ठरत आहेत.निपाणी देवरी येथील ६८ वर्षीय शेतकरी लक्ष्मण कोसमकार यांच्याकडे ४ एकर शेती आहे. दरवर्षी उत्पादन खर्च वजा जाता काहीच उरत नसून २०१४ मध्ये त्यांनी खरीप पिकांसाठी बचतगटाकडून २० हजार रुपये कर्ज घेतले. त्याआधारे सोयाबीन, तुरीची लागवड केली. मात्र, ऐन फुलोरावर सोयाबीनचे पीक असताना पावसाने दांडी मारल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत. तसेच तूर पिकावर अळ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे पिकही बुडाले. त्यामुळे कोसमकार यांना बचतगटाचे कर्ज फेडणे अशक्य होते. मात्र महिन्याचे व्याज वरचेवर भरल्याने मुद्दल देण्यासाठी अवधी मागितला. नंतर पैशाची तडजोड करून रबी हंगामात दोन एकरात हरभऱ्याची पेरणी केली. त्यातही हरभरा संवगणीदरम्यान वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मोठी फजिती झाली. पण पर्याय नव्हता. कारण खरीप पीक बुडाले. कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. ही भिस्त हरभरा पिकावर असल्याने धावपळीत नियोजन केले. मळणीयंत्र बोलावून हरभरा काढला. ज्यांनी संकटात हातभार लावला त्याचे देणे अगत्याचे समजून थेट मशीनमधून काढलेला हरभरा अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आणला आहे. (प्रतिनिधी)मासिक व्याजदराची सवलतबचत गटापेक्षा बँकेचे कर्ज का घेत नाही, असे शेतकरी कोसमकार यांना विचारले असता ते म्हणाले, बँकेचे कर्ज घेतल्यास एकदम व्याजासह द्यावे लागतात. एकतर निसर्गाची साथ नाही. त्यामुळे जेमतेम हाती आलेले पीक तोकडे, त्यात बँकेची एकरकमी द्यावी लागणारी देणी अशक्य होते. म्हणूनच बचत गटाकडून कर्ज घेणे परवडते.एका मुलाचा आधारलक्ष्मणराव कोसमकार यांना दोन मुले आहेत. त्यांचा एक मुलगा यवतमाळ येथे बसस्थानकावर गोळ्या-बिस्किटे विकून आपल्या संसाराचा गाडा हाकतो. त्यामुळे ते मदत करू शकत नाही. उलट आम्हीच त्याला देतो. दुसरा मुलगा अमरावतीत येऊन गवंडी काम करतो. त्याच्या मजुरीवर घरखर्च चालते. सत्तरीच्या उंबरठ्यावर आल्यानंतर या मुलाच्या आधारे शेतीची कामे करीत आहे, असे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.