शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची चाहूल, शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 01:28 IST

यंदाच्या पावसाळ्याचे १२० पैकी ४० दिवस झाले असतानाही १३ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी कमी आहे. विशेष म्हणजे, २४ जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सक्रिय न झाल्याने जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्धेअधिक पेरण्या रखडल्या आहेत.

ठळक मुद्देपावसाचा जोर ओसरला : आपत्कालीन पीक नियोजनासाठी कृषी विभाग गाफील

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्याचे १२० पैकी ४० दिवस झाले असतानाही १३ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी कमी आहे. विशेष म्हणजे, २४ जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सक्रिय न झाल्याने जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्धेअधिक पेरण्या रखडल्या आहेत. येत्या १७ तारखेपर्यंत पावसाची ही स्थिती कायम राहणार असल्याची हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे सलग तीन वर्षांपासून दुष्काळ अन् नापिकीने आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या स्थितीने धास्तावला आहे.उत्पादनखर्चाच्या तुलनेत एकाही शेतमालास हमीभाव मिळालेला नाही. खरीप कर्जासाठी बँका शेतकऱ्यांना माघारी पाठवित आहेत. कर्जही नाही अन् कर्जमाफीही नाही, या अवस्थेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना यंदाच्या हंगामात पावसाळ्याच्या ४० दिवसानंतरही पेरणीयोग्य पाऊस नसल्याने अल्प कालावधीतील मूग, उडीद आदी पिके बाद होणार आहेत. त्यामुळे पर्यायी पिके कोणती घ्यावी, यासाठीचे आपत्कालीन पीक नियोजन सांगण्यास कृषी विभाग अन् कृषी विद्यापीठ समोर आलेले नाहीत. राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यातच कृषी विभाग गाफील असेल, तर शेतकऱ्यांनी अपेक्षा तरी कोणाकडून करावी, असा बळीराजाचा सवाल आहे.यंदाच्या पावसाळ्यात १० जुलैपर्यंत पावसाची २३५ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५७ मिमी पाऊस झालेला आहे. ही टक्केवारी ६७ आहे. यामध्ये धारणी तालुका वगळता उर्वरित १३ तालुक्यांची सरासरी ही ५५ ते ७० टक्क्यांपर्यंतच आहे.वार्षिक सरासरीच्या १९ टक्केच पावसाची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. या आठवड्यात वातावरण ढगाळलेले असताना पाऊस मात्र बेपत्ता आहे. त्यामुळे अर्धेअधिक क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. जमिनीत आर्द्रता नाही. भूजलात प्रचंड घट आहे. सिंचन विहिरींनी तळ गाठलेला आहे. ही स्थिती यंदाही दुष्काळाची चाहूल देणारी असल्याने सद्यस्थितीत बळीराजा धास्तावला आहे.हवामानाची सद्यस्थितीमान्सूनचा अक्ष सध्या उत्तर भारतात सरकल्यामुळे विदर्भातील पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. पुढील १७ तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पावसाचे प्रमाण अपेक्षापेक्षा कमी राहील. सध्या हिंदी महासागर, अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतीही मोठी हवामान प्रणाली कार्यरत नसल्यामुळे विदर्भ व महाराष्ट्रातील पाऊस थंडावला आहे. ताबडतोब कमी दाबाचा पट्टा किंवा द्रोणीय स्थिती तयार होण्याची शक्यता नसल्याने हीच स्थिती पुढील पाच ते सहा दिवस कायम राहणार असल्यावे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.