शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

‘गौतम’च्या जाण्याने डोंगरगाव नि:शब्द

By admin | Updated: October 4, 2016 00:09 IST

कटरा ते वैष्णोदेवी मार्गावर देशरक्षणार्थ तैनात सीआरपीएफचा जवान डोळ्यांत तेल घालून कर्तव्य बजावत असताना अकस्मात खोल दरीत कोसळला.

‘ती’ माता अनभिज्ञच : जिल्ह्याने गमावला आणखी एक देशभक्तसंदीप मानकर/किरण होले अमरावती/दर्यापूरकटरा ते वैष्णोदेवी मार्गावर देशरक्षणार्थ तैनात सीआरपीएफचा जवान डोळ्यांत तेल घालून कर्तव्य बजावत असताना अकस्मात खोल दरीत कोसळला. त्यातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरनगरीच्या या सुपुत्राने रविवारी रात्री मातृभूमिच्या रक्षणार्थ प्राणांची आहुती दिली. उरी हल्ल्यात शहीद झालेल्या विकास उर्फ पंजाब उईकेच्या स्मृतींची जखम सुकत नाही तोच जिल्ह्याने दुसऱ्या एका लढवय्या जवानाला गमावले. त्याच्या जन्मगावी हे भयंकर वृत्त धडकताच त्याच्या गावात स्मशानशांतता पसरली आहे. पण, त्या वीरमातेला मात्र अद्याप तिचा लाडका गौतम शहीद झाल्याची माहिती वृत्त लिहिस्तोवर नव्हती. काही तरी विपरीत घडलेय...हे तिला उमगले असले तरी भयाण वास्तवाशी तिचा सामना एव्हाना व्हायचा होता.आणि हळहळले डोंगरगाव !अमरावती/दर्यापूर : दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या डोंगरगावचा गौतम भीमराव इंगळे हा रहिवासी. त्याचे मूळ गाव लांडी असले तरी दोन पिढ्यांपासून त्यांचे कुटूंब डोंगरगावात वास्तव्यास आहे. देशभक्तीच्या ओढीने गौतम सात वर्षांपूर्वी सीआरपीएफमध्ये दाखल झाला. सद्यस्थितीत तो सीआरपीएफ ६ बटालियनमध्ये जम्मू काश्मिरमध्ये कार्यरत होता. सीमेवर सध्या असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे ताण वाढलेला. प्रत्येक सैनिकावर जबाबदारी वाढलेली. पण, नेटाने कर्तव्य बजावत असतानाच कटरा ते वैष्णोदेवी मार्गावरील खोल दरीत तो कोसळला. कर्तव्य बजावत असतानाच त्याने अंतिम श्वास घेतला. गौतम देशासाठी शहीद झाला. जम्मू-काश्मिरात गौतम इंगळे याच्यासमवेत कार्यरत जवान गौतम दामले हे त्याच्या पार्थिवासह अमरावतीत येत आहेत. ते मूळ मोर्शीतील रहिवासी आहेत. अवघे १५०० लोकवस्तीचे डोंगरगाव. याच मातीत गौतम खेळला, बागडला, घडला. याच मातीने त्याला देशभक्तीची प्रेरणा दिली. तो सैन्यात दाखल झाला. पण, प्रत्येक वेळी तो सुटीत गावांत येई. गावाबद्दलचा त्याचा जिव्हाळा, आपुलकी तसूभरही कमी झाली नव्हती. सवंगड्यांना त्याच्या या स्मृती आता राहून-राहून आठवत आहेत आणि अख्खे डोंगरगाव गौतमच्या आठवणींमध्ये हळहळत असल्याचे चित्र आहे.‘ती’ वीरमाता अद्यापही अनभिज्ञचदोन बहिणींचा लाडका बंधूराज गौतम. आई रत्नाबाईचा लाडका मुलगा. पित्याच्या माघारी या माऊलीने मोठ्या लाडाकोडात गौतमचे पालनपोषण केले. एकुलता एक मुलगा असूनही छातीवर दगड ठेऊन त्याला सैन्यात दाखल केले. म्हणूनच या वीरमातेला तिच्या लाडक्या गौतमच्या मृत्युची बातमी कशी सांगावी, असा प्रत्येकाला पेच पडला होता. सगळे गाव मूकपणे अश्रू ढाळत असले तरी वृत्त लिहिस्तोवर या मातेला आपल्या काळजाच्या तुकड्याच्या मृत्युची बातमी देण्यात आलेली नव्हती.पत्नीचा मूक आक्रोश!अवघ्या चार वर्षांपूर्वी गौतमचा विवाह झाला. तिचे नाव प्रियंका. पती सैन्यात असल्याने प्रियंका नागपूर येथे माहेरीच अधिककाळ राहात असते. सुट्यांमध्ये गौतम गावी आला की, ती गावी येई. पतीच्या मृत्युचा आकस्मिक धक्का कसा पचवावा, हेच तिला कळत नाही. एव्हाना ती डोंगरगावात पोहोचली असली तरी वृद्ध सासूबार्इंना सावरण्याची मोठी जबाबदारी ती पेलत आहे. पतीच्याविरहाची जीवघेणी जाणीव असूनही ती केवळ मूकपणे अश्रू ढाळतेय.मृत्युच्या काही तासांपूर्वीच आईशी संवाद मृत्युच्या काही तासांपूर्वी म्हणजे रविवार २ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गौतमचा आईसोबत दूरध्वनीवरून संवाद झाला होता. रत्नाबार्इंशी झालेला तोच संवाद अखेरचा ठरला. गौतमचे शेवटचे तेच शब्द आठवून आता रत्नाबार्इंना आयुष्य काढायचे आहे. शौर्यगाथा सांगत असे गौतम!गावी सुटीवर आलेला गौतम आपल्या मित्रांमध्ये रमत असे. सैन्यातील शौर्यगाथा रंगवून सांगताना त्याला स्फुरण चढत असे. त्याला देशप्रेमाचे असे अनिवार भरते आल्याचे अनेकदा पाहिल्याचे त्याचे मित्र सांगतात. अशा लढवय्या गौतमच्या स्मृती सांगताना रोजगार सेवक देवधन उमाळे यांचा गळा अवरूद्ध झाला होता. मित्राच्या मृत्युचे वास्तव त्यांना पचनी पडत नव्हते.