शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

होकाराची डेडलाईन संपुष्टात, घनकचरा व्यवस्थापनावर मळभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:00 IST

बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीसाठी संबंधित कंपनीला देण्यात आलेली डेडलाईन संपुष्टात आली आहे.

ठळक मुद्देमहापालिकेला प्रतीक्षा : नव्याने निविदेचा पर्याय उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीसाठी संबंधित कंपनीला देण्यात आलेली डेडलाईन संपुष्टात आली आहे. दोन दिवसांत प्रकल्प उभारणीसंदर्भात होकार आल्यास महापालिका करारनामा करणार होती. तथापि कंपनीने होकाराचे पत्र न दिल्याने पुन्हा प्रकल्प अधांतरी लटकला आहे.१५.९८ कोटी रूपये किंमत असलेला प्रकल्प महापालिका, ‘कोअर प्रोजेक्ट’ पीपीपी तत्वावर साकारणार होते. मात्र, आधी राजकीय पेच आणि त्यानंतर निरी अहवालाच्या प्रतीक्षेत तब्बल दहा महिने उलटून गेले. नगरविकास विभागाने कुठलेही निर्देश न दिल्याने मनपाला प्रकल्पासाठी करारनामा करता आला नाही. कोअर प्रोजेक्ट ७.९९ कोटींमध्ये नेमके कुठले व्यवस्थापन करणार आहे. प्रकल्पाची उपयोगिता व प्रकल्पकर्त्यांवर कुठली बंधने टाकण्यात येतील, हे स्पष्ट झाले नाही. अन्य कंपनी याच प्रकल्पासाठी ४५ कोटींचा डीपीआर बनवित असताना महापालिका १५.९८ कोटी रूपये खर्चून नेमकी कुठली यंत्रे लावणार होती, हे सुद्धा उघड होऊ शकले नाही. त्यानंतर याप्रकल्पाची उपयोगिता व तांत्रिक योग्यतेचा चेंडू ‘निरी’कडे टोलविण्यात आला. मे च्या अखेरच्या आठवड्यात निरीचा अहवाल प्राप्त झाला. त्याअनुषंगाने मनपाने महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कुठलाही पत्रव्यवहार केला नाही. दरम्यान निविदेच्या अधिकृततेचा कालावधी संपुष्टात आल्याने कोअर प्रोजेक्टने याप्रकल्पातून माघार घेतली. निविदेतील वैधता कालावधी संपल्याने प्रकल्प उभारणीतून माघार घेत असल्याचे पत्र कोअर प्रोजेक्टने दिले. त्यानंतर प्रकल्पाची उपयुक्तता लक्षात घेऊन आयुक्तांनी सोमवार २८ आॅगस्टला कोअर प्रोजेक्टच्या प्रतिनिधीला प्रकल्प उभारणीबाबत साकडे घातले. दोन दिवसांत माघारीचे पत्र परत घेऊन काम करण्यास होकार दिल्यास लगेच करारनामा करु, असे आयुक्तांनी आश्वस्त केले. तथापि चार दिवस उलटूनही ‘कोअर प्रोजेक्ट’ने काम करण्यासंदर्भात कुठलेही पत्र दिले नाही. किंवा ‘टेलिफोनिक’ होकारही भरलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकल्प उभारणीवर मळभ दाटले आहे.देशमुखांची भूमिका अनाकलनीयनिरीचा अहवाल ‘कोअर प्रोजेक्ट’बाबत सकारात्मक असल्याचा दावा पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांनी केला. निरीने जर ‘कोअर प्रोजेक्ट’ करवी प्रकल्प उभारणीला हिरवी झेंडी दिली होती तर देशमुखांनी तेव्हाच करारनामा करण्यासाठी पाऊल का उचलले नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोअर प्रोजेक्टने माघारीचे पत्र दिल्यानंतरच का विनवणी करण्यात आली. तत्पूर्वी जुलै आणि आॅगस्ट महिन्यात ‘पारदर्शक’ देशमुखांना कुणाच्या आदेशाची प्रतीक्षा होती, हे अनाकलनीय आहे..