दर्यापूर : तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुले नदीकाठच्या शेतकऱ्यांना लाखोंचा फटका सहन करावा लागला. हजारो हेक्टर जमीन पावसामुळे खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिवृष्टीमुळे पेरण्या दडपल्या असून अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. यंदा पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांना मूगा ऐवजी सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. परंतु ३६ तासात तालुुक्यात ११३,७ मि.मी. पाऊस झाला. पूर्णा, चंद्रभागा, शहानूर, भुलेश्वरी या नद्यांना महापूर आल्याने पेरण्यांना मोठा फटका बसला. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शिरजदा, कळाशी, टाकली, पनोरा परिसरातील शेतीची मोठी हानी झाली. पूर्णा नदी काठच्या शेतीची दुरवस्था जाली. इतकेच नव्हे तर रामगाव, कोळंबी, माहुली, पेठ इतबारपूर, बाभळी, शिवर, हिंगणी परिसरातील शेतीचे चंद्रभागेच्या पुराने मोठे नुकसान झाले आहे. परंतु तालुका कृषी अधिकारी कार्यालय, महसूल विभागाच्यावतीने अद्याप या नुकसानीचे कोणतेच सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांनी तत्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे. (प्रतिनिधी
दर्यापूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
By admin | Updated: July 26, 2014 23:53 IST