शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीच्या धाडसामुळे प्राध्यापकाचे ‘चाळे’ उघडकीस

By admin | Updated: May 31, 2015 00:21 IST

शहरातील एका प्राध्यापकाने महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करुन तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे ...

हेल्पलाईनने दिली ताकीद : शहरातील नामांकित महाविद्यालयातील घटनाअमरावती : शहरातील एका प्राध्यापकाने महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करुन तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरु केले. वर्षभरापासून हा प्रकार सुरु असल्यामुळे ती विद्यार्थिनी मानसिक तणावात आली. मात्र, अखेर एका डॉक्टरने दिलेल्या सल्ल्यानुसार तिने धाडस करून प्राध्यापकाचे चाळे उघड केले. त्या विद्यार्थिनीला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील हेल्पलाईनने मदतीचा हात देऊन त्या रंगेल प्राध्यापकाला ताकीद दिली आहे. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात इंग्रजी वाड.मय विषयाच्या प्राध्यापकाने ओळखीतील एका विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केले. ओळखीतील प्राध्यापक असल्यामुळे ही बाब पीडित विद्यार्थिनीने कोणाला सांगितली नव्हती. मात्र, प्राध्यापकाचा त्रास वाढतच गेला. नंतर त्याने तिचे व्हिडिओ क्लिपिंग बनवून धमक्याही देणे सुरु केल्याने मुलगी मानसिक तणावात आली. तिची प्रकृती बिघडली. उपचार सुरू झाले. उपचार करणाऱ्या डॉक्टरलाही ती खरे कारण सांगू शकली नाही. डॉक्टरांनी तिच्यावर औषधोपचार सुरु केलेत. मात्र, उपयोग होत नव्हता. अखेर तिने मोठ्या धाडसाने डॉक्टरला हा सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी डॉक्टरांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील हेल्पलाईनकडे जाण्याचा सल्ला दिला. शेवटी तिने १५ मार्च रोजी हेल्पलाईनकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यावरून हेल्पलाईनचे पदाधिकारी संजय तिरथतकर व राजेश सांगोले यांनी त्या प्राध्यापकाला बोलावून घेतले. प्राध्यापकाने आपल्या चुकीची कबुली हेल्पलाईनसमोर दिली. तसेच यापुढे असा प्रकार न करण्याचे, हमीपत्री लिहून दिले. विद्यार्थिनीच्या धाडसामुळे हा प्रकार उघडकीस आला. नंतर याबाबतची माहिती राजापेठ पोलीस ठाण्याला सुध्दा देण्यात आल्याचे पीडित मुलीने सांगितले. या मुलीचे हेल्पलाईनने कौतुुक केले आहे.