शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी सागवान वृक्षांवरील फुलोर ओसरला

By admin | Updated: July 14, 2014 23:42 IST

अमरावती : पावसाळा सुरु झाला की, मेळघाटात सागवान वृक्षांवर फुलोर बहरतो. मात्र, यंदा पावसाचा पत्ताच नसल्याने सागवान वृक्षांवर फुलोर बहरला नाही. त्यामुळे भविष्यात सागवान वृक्षांची संख्या कमी

गणेश वासनिक - अमरावतीअमरावती : पावसाळा सुरु झाला की, मेळघाटात सागवान वृक्षांवर फुलोर बहरतो. मात्र, यंदा पावसाचा पत्ताच नसल्याने सागवान वृक्षांवर फुलोर बहरला नाही. त्यामुळे भविष्यात सागवान वृक्षांची संख्या कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर दुर्मीळ वनौषधींचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा सध्या आभाळाकडे लागल्या आहेत. विदर्भाचे वनवैभव म्हणून नावरुपास आलेल्या मेळघाटात वन्यप्राणी, वृक्षे, झाडाझुडपांना देखील पावसाचे वेध लागले आहेत. पावसाळ्यात सागवान वृक्षांवर फुलोर बहरतो. फुलोर बहरल्यानंतर काही दिवसांनी सागवान वृक्षांच्या बिया तयार होऊन त्या जमिनीवर पडतात. उन्हाळ्यात या बिया फुटून त्या जमिनीत शिरतात व पावसाळ्यात बिया अंकुरतात. या प्रक्रियेनुसार मेळघाटात सागवान वृक्षांची वाढ होते. यंदा पावसाअभावी ७७२ वृक्ष प्रजातींचे अस्तित्व धोक्यात येण्याचे चिन्हे आहेत. पाऊस नसल्याने मेळघाटात गवत प्रजाती उगवल्याच नाही. गवत उगवले नसल्याने गवतावर अवलंबून असलेल्या तृणभक्षी प्राण्याच्या आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तृणभक्षी प्राण्यांना गवत नाही. त्यामुळे ही संख्या रोडावत चालली आहे. तर वाघांचे भक्ष असलेल्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी होत चालल्याने वाघांचे जीवन धोक्यात आले आहे. पावसावर एकुणच जीवनचक्र अवलंबून असून यंदा सागवान वृक्षांची संख्या कमी होणार असल्याने लाखो रुपयांचे वनविभागाचे नुकसान होण्याचे संकेत आहे. पावसाअभावी वृक्षांसह वन्यप्राणी, पशुपक्षांना नुकसान होण्याचे भाकित वनअधिकाऱ्यांनी वर्तविले आहे.