शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकाच मार्गावरील दुहेरी वाहतूक जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात सिमेंट रस्त्याच्या बांधकामामुळे एकाच मार्गावर चालणारी वाहतूक जीवघेणी ठरत आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने दररोज कित्येक अपघात घडत आहेत. आणखी किती नागरिकरांना हातपाय मोडावे लागणार आहे, असा सवाल आता अमरावतीकर करू लागले आहे.इर्विन चौक ते बाबा कार्नरपर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम काही दिवसांपासून सुरू ...

ठळक मुद्देआणखी किती अपघात होणार? वाहतूक नियंत्रणाचा बोजवारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात सिमेंट रस्त्याच्या बांधकामामुळे एकाच मार्गावर चालणारी वाहतूक जीवघेणी ठरत आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने दररोज कित्येक अपघात घडत आहेत. आणखी किती नागरिकरांना हातपाय मोडावे लागणार आहे, असा सवाल आता अमरावतीकर करू लागले आहे.इर्विन चौक ते बाबा कार्नरपर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे नवनिर्मित जिल्हा स्टेडीयमसमोरील एकाच मार्गावर वाहनाची वर्दळ सुरू झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी एक व्यक्ती दुचाकीवर पाच वर्षीय चिमुकलीला घेऊन जिल्हा स्टेडीयममधून मुख्य मार्गावर आली असता अचानक पंचवटी उड्डाणपुलावरून भरधाव येणारी दुचाकी धडकली. या अपघातात वडील किरकोळ जखमी झाले, मात्र, त्या चिमुकलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. वाहतूक पोलिसांसमक्षच हा अपघात घडला. पोलिसांनी तत्काळ दोन्ही दुचाकी रस्त्याच्या बाजूला केल्या आणि जखमीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. अपघात घडविणाऱ्या दुचाकीस्वाराला गाडगेनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अशाप्रकारचे दररोज अनेक अपघात एकतर्फी मार्गावरील दुहेरी वाहतुकीमुळे घडत असल्याचे दिसून येत आहे. बडनेरा मार्गावरील समर्थ हायस्कूल चौक ते नवाथे नगरापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या मार्गावरसुद्धा अनेक अपघात होत आहेत. काहींना अपंग, तर काहींचे डोके फुटले आहे. अशा अपघातातील जखमी तत्काळ खासगी रुग्णालय गाठून उपचार घेत आहेत. अपघात घडविणारे वाहनचालक रुग्णालयीन खर्च करण्याची तयारी दाखवीत असल्यामुळे या अपघाताच्या पोलीस तक्रारीसुद्धा होत नसल्याचे आढळून येत आहे. मात्र, आणखी किती दिवस अशाप्रकारच्या अपघातातून जीव टांगणीवर ठेवावा लागणार आहे. हीच चिंता नागरिकांना सतावत आहे. अशा वाहतुकीसंदर्भात वाहतूक नियोजन व नियंत्रित व्हावे, अशी अपेक्षा अमरावतीकर करीत आहे.दुहेरी वाहतूक बंद करता येणार नाही. मात्र, वेगमर्यादेवर लक्ष देता येईल. या वाहतूक समस्येबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न करू.- रणजित देसाई,सहा. पोलीस आयुक्त,वाहतूक शाखा