शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

सुकळी डंपिंग यार्ड धुमसतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 22:02 IST

उन्हाळ्याला प्रारंभ होताच नजीकच्या सुकळी कंपोस्ट डेपोला आग लागण्यास सुरूवात झाली असून, मागील पंधरवड्यात आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट होते. ती आग आटोक्यात आली असली तरी अजूनही येथील एका भागात आग धुमसतच आहे. या आगीच्या घटनेला मनपा प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाळ्याला प्रारंभ होताच नजीकच्या सुकळी कंपोस्ट डेपोला आग लागण्यास सुरूवात झाली असून, मागील पंधरवड्यात आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट होते. ती आग आटोक्यात आली असली तरी अजूनही येथील एका भागात आग धुमसतच आहे. या आगीच्या घटनेला मनपा प्रशासनाने दुजोरा दिला आहे.शहरातील संपूर्ण कचरा सुकळी डम्पिंग यार्डमध्ये साठवला जातो. मागील १५ दिवसांपासून येथे आगीच्या तुरळक घटना घडत आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश येते. मात्र, डम्पिंग यार्डवरील कचऱ्यातील मिथेन वायूशी उन्हाचा वारंवार संपर्क येऊन पुन्हा आग लागत असल्याने प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार लागणाºया या आगीमुळे या भागातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आगीसोबत बाहेर पसरणाºया धुराचा परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार जाणवू लागले आहेत.शहरातून दररोज निघणारा २०० टन कचरा सुकळी स्थित ९.३८ हेक्टरवर पसरलेल्या कम्पोस्ट डेपोत विना प्रक्रिया साठविला जातो. तेथील दुर्गंधीमुळे सुकळी, रसुलपूर या ग्रामस्थांना प्रचंड त्रास होत असताना आगीच्या घटनांमुळे त्यात भर पडली आहे. औरंगाबादप्रमाणे सुकळी येथील ग्रामस्थांचाही येथे कचरा टाकण्यास विरोध होत असून, आगीच्या घटनांमुळे व ती आग पंधरा दिवसांपासून धुमसत असल्याने असंतोष वाढू लागला आहे. त्यावर प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन उपाययोजना चालविल्या आहेत.प्रशासनाच्या उपाययोजनाकंपोस्ट डेपोत वेळोवेळी लागत असलेल्या आगी विझविण्याकरिता अग्निशमन विभागाचे एक वाहन कायमस्वरूपी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तेथे ठेवण्यात आले आहे. आग नियंत्रणाची जबाबदारी स्वास्थ्य निरीक्षक किशोर संगेले यांच्याकडे देण्यात आली. जुन्या बोअरवेलची दुरुस्ती व नवीन बोअरवेल तयार करण्यात येणार आहे. नजीकच्या शेतातील विहिरीचे पाणी आग विझविण्याकरिता घेण्याच्या सूचना आयुक्त पवारांनी केल्या आहेत.का पेटतो कचरा?मागील अनेक वर्षांपासून सुकळी कंपोस्ट डेपोत सात ते आठ लाख टन कचरा विनाप्रक्रिया पडला आहे. ७० ते ८० फूट थराचा हा कचरा मिथेन वायूमुळे पेट घेतो. उन्हात कचरा तापतो; त्यात कचºयामुळे निर्माण होणारा मिथेन वायू पेट घेतो. यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात.