शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क हाेणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST

गणेश वासनिक अमरावती : गतवर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती, क्यार व महा च्रकिवादळाने आलेल्या अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील महाविद्यालयीन ...

गणेश वासनिक

अमरावती : गतवर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती, क्यार व महा च्रकिवादळाने आलेल्या अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालकांकडे पाठवावे लागणार आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने १५ डिसेंबर रोजी प्राचार्यांना पत्र पाठविले आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी पुत्रांना उच्च शिक्षण घेताना अडीअडचणी येऊ नये, यासाठी उच्च व शिक्षण विभागाने २१ नोव्हेंबर २०१९ आणि २६ नोव्हेंबर २०२० असे दोन प्रकारे शासनादेश जारी करून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोरोना महामारीच्या कारणास्तव परीक्षा शुल्क माफी देण्याबाबत विलंब झाला आहे. उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी २७ नोव्हेंबर २०२० रोजी विद्यापीठांना पत्र निर्गमित करून दुष्काळग्रस्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ देण्याबाबत निर्देश दिले आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्राचार्यांना पत्र पाठवून सदर विद्यार्थ्यांचे प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालकांकडे पाठविण्याबाबत कळविले आहे. सन २०१९-२०२० च्या परीक्षा शुल्कमाफीची कार्यवाही केली जाणार आहे ही कार्यवाही करताना प्राचार्याना शासनादेशाचा आधार घ्यावा लागणार आहे. राज्यात एकूण ३४९ तालुके तर, अमरावती विद्यापीठ अंतर्गत ५६ तालुक्यांत दुष्काळग्रस्त शेतकरीपुत्रांना परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे.

----------------------

विद्यापीठ अंतर्गत ५६ तालुक्यांचा समावेश

- अमरावती : भातकुली, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, तिवसा, धारणी, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चिखलदरा.

- अकोला : अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, अकोला, बार्शिटाकळी व मुर्तिजापूर.

- यवतमाळ : कळंब, यवतमाळ, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, नेर, आर्णी, बाभुळगाव, पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव, पांढरकवडा, वणी, मोरगाव व झरी.

- वाशिम: मालेगाव, वाशिम, रिसोड, मंगळूर पीर, मानोरा व कारंजा

- बुलडाणा : मलकापूर, चिखली, बुलडाणा, मोताळा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, खामगाव, शेगांव, संग्रामपूर, नांदुरा व जळगांव जामाेद.

----------------------------

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्राचार्याना दिले आहे. एकूण लाभार्थी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालकांकडे पाठवावे लागणार आहे. नवीन वर्षात शेतकरीपुत्रांना लाभ मिळेल, असे नियोजन आहे.

- हेमंत देशमुख. संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.