शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मागणीच्या तुलनेत ४० टक्केच दुष्काळी मदत

By admin | Updated: January 12, 2015 22:42 IST

अपुऱ्या पावसामुळे बाधित झालेल्या ४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी मागणी असलेल्या ३०२ कोटी ५१ हजारापैकी १२५ कोटी ७९ लाखाची मदत सर्व तालुक्यात वितरीत करण्यात आलेली आहे.

अमरावती : अपुऱ्या पावसामुळे बाधित झालेल्या ४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी मागणी असलेल्या ३०२ कोटी ५१ हजारापैकी १२५ कोटी ७९ लाखाची मदत सर्व तालुक्यात वितरीत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात वितरित करावयाच्या एकूण अनुदानाच्या तुलनेत केवळ ४० टक्केच हा निधी आहे. किती गावामधील किती शेतकऱ्यांना हा निधी वाटप करावा हा पेच निर्माण झाला आहे. उपलब्ध निधी वर्णाक्षरानुसार गावाची निवड करून वितरीत करण्यात येणार असल्याची महसूल विभागाने दिली. खरीपाचा हंगाम सरासरीपेक्षा कमी पाऊस, निकृष्ठ सोयाबीन बियाणे, दुबार, तिबार पेरणी, दोन महिना उशीराने झालेली पेरणी, रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस न आल्यामुळे पीक उद्धवस्त झाले. जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे १५ नोव्हेंबरला शासनाने घोषित केली, राज्य विधी मंडळाच्या नागपूर अधिवेशनात शासनाने ११ डिसेंबर २०१४ ला दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यासाठी ७ हजार कोटी रूपयांचे पॅकेज घोषित केले. शासनाच्या घोषणेच्या २७ दिवसानंतर शासन निर्णय जाहीर झाला. जिल्ह्यात ३०२ कोटी ५१ लाखाची मदत अपेक्षीत असताना ४० टक्के नुसार १२५ कोटी ७९ लाख रूपये जिल्ह्यास ८ जानेवारीला मिळाले व शुक्रवार ९ जानेवारीला जिल्ह्यातील १४ तहसील कार्यालयास हा निधी वर्ग करण्यात आला. या निधीचे वाटप कसे आणि कोणत्या गावामधील शेतकऱ्यांना हा पेच महसूल यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे. उपलब्ध निधी हा मदतीचा पहिला टप्पा असला तरी जिल्ह्यास १७६ कोटी २२ लाख रूपये दुष्काळी मदत मिळणे अद्याप बाकी आहे.