शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

झेब्रा क्रॉसिंगवर वाहनचालकांचे अतिक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST

फोटो मनीषकडे पान १ लोकमत विशेष अमरावती : अपघात होऊ नये, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग ...

फोटो मनीषकडे

पान १

लोकमत विशेष

अमरावती : अपघात होऊ नये, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग असते. झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांसाठी असून, ते त्यांना वापरता यावेत, अशी त्यामागील भूमिका आहे. मात्र, त्याच भूमिकेला अमरावती शहरात छेद दिला जात आहे. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करू नये, हा साधा नियमही येथे पाळला जात नसल्याचे वास्तव आहे. झेब्रा क्रॉसिंगवर स्टॉप लाईन असते. या लाईनच्या पुढे वाहन गेल्यास दंडात्मक कारवाई अपेक्षित आहे.

वाहतुकीच्या समस्येवर सर्वच स्तरातून प्रचंड ओरड होताना दिसत आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांकडून कारवाईचा दंड लाखो रुपयांनी वसूल केला जातो. मात्र, त्या तुलनेत वाहतूक व्यवस्था सुधारणेसाठी पुढाकार घेतला जात नाही. शहरातील अनेक चौक व महत्त्वपूर्ण रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग धूसर झाले आहेत. कुणीही वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगच्या मागे वाहने उभी करत नाहीत. वाहतूक पोलीसदेखील त्यांना हटकत नाहीत. शहरातील विविध संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन मुले अशांकडून शहरातील सिग्नलवर लोकांना वाहतुकीचे किमान नियम पाळले जावे म्हणून प्रयत्न होताना दिसतात. मात्र, त्यालाही यश आलेले दिसत नाही.

बॉक्स

प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई

सिग्नल हिरवा होण्यास १० सेकंद बाकी असताना वाहनचालक जोरात हॉर्न वाजवायला सुरुवात करतात. अनेकदा सिग्नल हिरवा होण्यापूर्वीच वाहनचालक पुढे निघालेले सर्रास दिसतात. राजकमल चौक, पंचवटी चौक, इर्विन चौक, शेगाव नाका चौक येथे हे चित्र सर्रास पाहावयास मिळते.

////////////

फूटपाथवर अतिक्रमण, मग चालायचे कुठून?

रस्त्याच्या कडेला फूटपाथवर अतिक्रमण वाढले आहे. चौक ओलांडताना पादचाऱ्यांना अनेकदा जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांचे तर प्रचंड हाल होतात. रस्ता ओलांडताना अनेकदा झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी केलेली असतात. त्यात सिग्नल न पाळण्याची शर्यत लागलेली असल्यामुळे रस्ता क्रॉस करत असलेल्या लोकांवरच ओरडत वाहनचालक निघून जातात.

/////////////////////

काय आहे नियम?

झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे असलेल्या पहिल्या लाईनवर आपले वाहन उभे करायला पाहिजे, असा नियम सांगतो. मात्र, शहरातील अनेक चौकात जेथे झेब्रा क्रॉसिंग आहे, तेथेच दुभाजक संपतो. त्यामुळे दुभाजकाच्या समांतर रेषेत वाहन लावणे योग्य अशी वाहनचालकांचा गोड गैरसमज झालेली आहे.