शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मद्यधुंद अवस्थेत चालकाने चालवली महामार्गावर बस; प्रवाशांची प्राणांशी गाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 09:55 IST

परतवाडा-भंडारा बसच्या मद्यपी चालक व वाहकाचा प्रतापामुळे महामार्गावर तब्बल ८५ किलोमीटरपर्यंत पन्नास प्रवाशांची प्राणाशी गाठ पडली होती. अखेर त्यांच्याच प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. रविवारी रात्री ७ वाजता ही घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देपरतवाडा-भंडारा बसच्या मद्यपी चालक-वाहकाचा प्रताप

अमित कांडलकर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: परतवाडा-भंडारा बसच्या मद्यपी चालक व वाहकाचा प्रतापामुळे महामार्गावर तब्बल ८५ किलोमीटरपर्यंत पन्नास प्रवाशांची प्राणाशी गाठ पडली होती. अखेर त्यांच्याच प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. रविवारी रात्री ७ वाजता ही घटना उघडकीस आली.भंडारा आगाराची एमएच ४० एक्यू ६४२१ क्रमांकाची बस परतवाड्याहून भंडारा येथे परतीच्या प्रवासाला निघाली होती. चालक सचिन चव्हाण (३४) व वाहक पांडे (५०) हे दोघेही दारू प्यायलेले होते. चालक अक्षरश: झिंगत असल्याचा धक्कादायक प्रकार प्रवाशांच्या निदर्शनास आला. त्यांनी वेळीच हा प्रकार लढा संघटनेचे संजय देशमुख यांना कळविला. त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. तिवसा पोलिसांनी सदर बस मोझरी स्थानकावर थांबवून घेतली. तोपर्यंत बसने ८५ किलोमीटरचा प्रवास केला होता.तिवसा पोलिसांनी प्रवाशांना अन्य बसने पुढे पाठवले आणि चालक-वाहकांना ताब्यात घेऊन त्यांची रुग्णालयात तपासणी केली. यावेळी दोघांनी मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्याचे आढळले. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये चालक सचिन चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल केला. वाहक पांडेविरुद्ध राज्य परिवहन महामंडळ कारवाई करणार असल्याचे तिवसा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तिरपुडे यांनी सांगितले.प्रवाशांचे प्रसंगावधानपरतवाडा-भंडारा बसमध्ये नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती. सुदैवाने रात्रीची वेळ आणि रविवार असल्याने महामार्गावर वर्दळ कमी होती. चालक-वाहक झिंगल्याचे लक्षात येताच मोझरी स्थानकात बस थांबवून प्रवाशांनी बस रोखून धरली.रविवारी प्रवास खरंच जीवघेणा होता. चालक व वाहक दोघांनीही मद्यपान केले होते. मध्येच चालक झिंगलेल्या अवस्थेला पोहोचत होता. ही बाब पाहून अखेर आम्ही बस मोझरी बस स्थानकावर थांबविली.- नितीन साबळे, प्रवासीमला बसमधील प्रवाशांनी भ्रमणध्वनीवर माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. बस मोझरीत थांबवून पुढील अनर्थ टाळता आला, हे सुदैव.- संजय देशमुख, लढा संघटना प्रमुख.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह