फुबागावनजीकची घटना : वाहतुकीचा खोळंबानांदगाव खंडेश्वर : अमरावती-यवतमाळ मार्गावरील फुबगाव फाट्याजवळ ट्रेलर उलटून चालक ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. एम.एच.४० ए.के. १८८५ क्रमांकाचे चौदा चाकी ट्रेलर गुजरातवरून बुटीबोरी येथे कारखान्यासाठी पीटीए पावडर घेऊन जात होते. दरम्यान चालकाचे संतुल बिघडल्याने हे ट्रेलर उलटले. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत, वाहतूक पोलीस लखन हटवार, विलास चव्हाण घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रेलरखाली दबलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी गॅसकटर व जेसीबी मशीन बोलविली. मात्र, वृत्तलिहेपर्यंत ट्रेलरचालकाचे नाव कळू शकले नाही. काही वेळ वाहतूक अवरूद्ध झाली होती. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. (तालुका प्रतिनिधी)
रेलर उलटून चालक ठार
By admin | Updated: January 12, 2017 00:08 IST