शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

डोळ्यांशिवाय पाहिलेले मयुरचे स्वप्न पूर्ण

By admin | Updated: June 17, 2014 23:57 IST

आधीच आर्थिक विपन्नावस्था त्यात जन्मांधपणाचा शाप. पण, त्याने हार मानली नाही. शारीरिक वैगुण्यावर मात करून उज्ज्वल यश संपादन करण्याचे त्याचे स्वप्न होते. दहावीचा निकाल घोषित झाला

अमरावती : आधीच आर्थिक विपन्नावस्था त्यात जन्मांधपणाचा शाप. पण, त्याने हार मानली नाही. शारीरिक वैगुण्यावर मात करून उज्ज्वल यश संपादन करण्याचे त्याचे स्वप्न होते. दहावीचा निकाल घोषित झाला अन् ८५.६० टक्के गुणांसह त्याचे हे डोळ्यांशिवाय पाहिलेले स्वप्नही पूर्ण झाले. स्थानिक सायन्सकोर (जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा)चा विद्यार्थी मयूर गणेश गवळी याची ही प्रेरणादायी यशोगाथा. मयूरला शिक्षणाची प्रचंड ओढ. त्यासाठी त्याला लहानपणापासूनच आई-वडिलांपासून लांब रहावे लागले. भविष्यात प्रध्यापक होण्याचे स्वप्न उराशी घेऊन तो लढत राहिला. इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण त्याने स्थानिक डॉ. नरेंद्र भिवापुरकर अंध विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्याने सायन्सोकरच्या शाळेत प्रवेश घेतला. सध्याही तो अंध विद्यालयाच्या वसतिगृहातच राहतोय. दहावीची परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण करण्याचे त्याचे ध्येय होते. त्यासाठी त्याने जिद्दीने रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. अखेरीस त्याची दुर्दम्य महत्वाकांक्षा आणि प्रचंड परिश्रमांना यश आले. अतिशय विपरीत परिस्थितीत कोणतीही शिकवणी नसतांना इतकेच नव्हे तर नेत्रहिन असूनही त्याने दहावीची कठीण परीक्षा ८५.६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केली.नागपुरच्या बुटीबोरी येथील रहिवासी गणेश व प्रमीला गवळी या मयूरच्या मातापित्यांचा आनंद आज गगनात मावेनासा झालाय. त्याची बहिण पुनम हिला देखील भावाच्या यशामुळे आकाश ठेंगणे झालेय. मयूरला त्याच्या या यशाचे गमक विचारले असता त्याने यशाचे बहुतांश श्रेय त्याची मावशी इंदूबाई तिरळकर यांना दिले. इंदूबाई तिरळकर गोपालनगर नजीकच्या पवन नगर येथे राहतात. आई-वडिलांच्या अपरोेक्ष मावशीने दिलेल्या पाठबळामुळेच आपण हे यश मिळवू शकलो, असे मयूरने आवर्जून सांगितले. शिकवणी नसल्याने शाळेतील अभ्यासक्रमाच्या भरवशावरच त्याने परीक्षा दिली. याकामी त्याला वर्गशिक्षकांचे भरघोस सहकार्य मिळाले. माध्यमिक शालांत परीक्षेत मयूरला ५०० पैकी ४२८ गुण मिळाले आहेत. मयूरने त्याच्या यशाचे श्रेय आई- वडिल, इंदूबाई तिरळकर,यशवंत तिरळकर, मावस बहिण विजया पेठेकर, शिक्षक महादेव तायडे, प्रज्ञा रामटेके, वसुंधरा काळे आणि वसतिगृहाचे प्राचार्य नवनाथ इंगोले व अधीक्षक पंकज मुदगल यांना देतो.