शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

आखाड्यात दंगल; १५ विद्यार्थी जखमी

By admin | Updated: December 13, 2014 22:29 IST

आशिया खंडातील सर्वात मोठी क्रीडासंस्था म्हणूून ओळखले जाणाऱ्या स्थानिक श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास दिल्ली-सिक्कीमच्या विद्यार्थ्यांचे

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ : दिल्ली-सिक्कीमच्या विद्यार्थ्यांमध्ये धुमश्चक्री, प्रभाकरराव वैद्यही जखमी अमरावती : आशिया खंडातील सर्वात मोठी क्रीडासंस्था म्हणूून ओळखले जाणाऱ्या स्थानिक श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास दिल्ली-सिक्कीमच्या विद्यार्थ्यांचे दोन गट समोरासमोर आले. क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेला वाद टोकाला पोहोचल्याने झालेल्या हाणामारीत तब्बल १० विद्यार्थी जखमी झाले तर हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हेदेखील झटापटीत जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांमध्ये पिंम्पा थेरसिंग (२३), सुभालाल राई गोविंदसिंग (२२), शिशिर चैत्री (२१), प्रमेश राजू चैत्री (२३), लाखो राय सिरीन (२१) सर्व रा. सिक्कीम, मयूर अनिल कुमार (२२, रा. एस.पी. रोड, दिल्ली) व अन्य ९ जणांचा समावेश आहे. हव्याप्र मंडळात विविध क्रीडा प्रकारांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी देशाच्या विविध प्रांतातून विद्यार्थी येतात. येथील वसतिगृहात त्यांचा मुक्काम असतो. अनेकदा त्यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद उद्भवतात. पण, शिक्षकांच्या मध्यस्थीनंतर लगेच प्रकरण मिटतात. शनिवारी सकाळी येथील वसतिगृहातील स्नानगृहात आंघोळ करण्यावरून दिल्ली व सिक्कीमच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद व हाणामारी झाली. हे दोन्ही विद्यार्थी बीपीएडच्या प्रथम वर्षाला शिकतात. सिक्कीमच्या विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचे कळताच मणीपूर, उत्तर प्रदेश व सिक्कीमच्या अन्य विद्यार्थ्यांनी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास हव्याप्र मंडळाच्या बाहेरील वीर वामनराव जोशी शाळेजवळील असलेल्या वसतिगृहातील दिल्लीच्या विद्यार्थ्यांवर हल्लाबोल केला. दोन्ही गट आक्रमक झाले. क्षणात राडा सुरू झाला. काही विद्यार्थ्यांनी एकमेकांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. काहींनी दगड, विटांचा मारा केला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच हव्याप्र मंडळाचे पदाधिकारी व शिक्षक घटनास्थळी पोहोचले. दोन्ही गटातील विद्यार्थ्यांची समजूत काढून त्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. गांधी चौकातही धांदलहाणामारी सुरु असताना बचावात्मक पवित्रा घेऊन काही विद्यार्थ्यांनी गांधी चौकाकडे पलायन केले. तर दुसऱ्या गटाने त्यांचा पाठलाग करून मारहाण केली. यामुळे गांधी चौकात बघ्यांची गर्दी उसळली होती. दोन वर्षांतील दुसरी घटनाहव्याप्र मंडळात विविध राज्यांतून विद्यार्थी शारीरिक शिक्षण घेण्याकरिता येतात. त्यांच्यामध्ये अनेकदा वाद निर्माण होतात. गेल्या वर्षी काही विद्यार्थ्यांनी मद्यप्राशन करुन विद्यार्थीनीची छेड काढली होती. तेव्हा राडा झाला होता.