शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

डॉ.भाऊसाहेब देशमुखांचा जयंत्युत्सव शुक्रवारपासून

By admin | Updated: December 16, 2015 00:10 IST

शिक्षणमहर्षि डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११७ व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन ...

विविध कार्यक्रम : २७ ला गडकरींची उपस्थितीअमरावती : शिक्षणमहर्षि डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११७ व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन १८ ते २७ डिसेंबरदरम्यान करण्यात आले आहे. २७ डिसेंबर रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. डॉ.भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंत्युत्सवानिमित्त मुख्य कार्यक्रमाचे आयोजन २७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये पुष्पांजली, मानवंदना आणि डॉ.पंजाबराव जन्मशताब्दी स्मृती महापौर सुवर्णपदक, प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व उत्कृष्ठ शाळा पुरस्कार तसचे प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिकांची घोषणा, शिवसंस्था त्रैमासिक व दैनंदिनी २०१६ चे विमोचन आणि शिवाजी कृषी पर्यटन प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके राहतील. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री ना.प्रवीण पोटे, खा.आनंद अडसूळ, आ.सुनील देशमुख, महापौर चरणजितकौर नंदा आदी गणमान्य उपस्थित राहतील. संस्था विकासासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’१९३६ साली स्थापन झालेली श्री शिवाजी शिक्षण संस्था २०३६ साली शतकमहोत्सव साजरा करणार आहे. २०३६ पर्यंत श्री शिवाजी शिक्षण संस्था कशी असावी, यासाठी संस्थेच्या प्रत्येक घटकावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वर्गशिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य अािण शिवपरिवाराशी संलग्न सर्वांकडून अभ्यासपूर्ण प्रस्ताव मागविले जाणार आहेत. या सर्वसमावेशक अहवालानंतर संस्थेचे २०३६ सालच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’ ला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी माहिती संस्थाध्यक्ष अरुण शेळके यांनी दिली. संस्थेचे ‘अ‍ॅटानॉमी’साठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.