शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात आढळला दुतोंड्या मांडूळ साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 13:36 IST

नजीकच्या गौलखेडा कुंभी येथील एका नालीत सोमवारी सायंकाळी ६ वाजता दुतोंड्या (मांडूळ) साप आढळला.

ठळक मुद्देअंधश्रद्धेतून कोट्यवधीची किंमत वनविभागाने घेतले ताब्यात, गौलखेड्यात बघ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नजीकच्या गौलखेडा कुंभी येथील एका नालीत सोमवारी सायंकाळी ६ वाजता दुतोंड्या (मांडूळ) साप आढळला. सर्पमित्र सुरमा भोपाली यांनी तो साप पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला.सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीत परिसरातील नागरिकांना दुतोंड्या साप दिसला. तो सर्वसामान्य साप असल्याच्या भीतीने नागरिकांनी तातडीने सर्पमित्र असलेले सुरमा भोपाली यांना दूरध्वनीवर संपर्क करून पाचारण केले. त्यांनी नालीतून साप बाहेर काढल्यानंतर मात्र नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. हा दुर्मीळ साप परतवाडा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे यांच्या स्वाधीन करण्यात आला.परतवाडा-खंडवा या आंतरराज्यीय महामार्गावर गौलखेडा कुंभी हे गाव आहे. नालीतून बाहेर काढताच सापाने रस्त्यावर धाव घेतली. त्यामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती.सापाला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली.कोट्यवधीचा सापआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सापासाठी कोट्यवधी रुपये मोजले जातात. त्यामुळे त्याचा शोध घेऊन तस्करीही होते. गत महिन्यात दयार्पूरनजीक वनविभाग आणि पोलिसांच्या पथकाने तस्करांना दुतोंड्या सापासमवेत पकडले होते. या सापासाठी अडीच कोटींची बोली लागली होती. या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली होती.गौलखेडा कुंभी येथ सर्पमित्र सुरमा भोपाली यांनी दुतोंड्या साप पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला. वरिष्ठांना माहिती देऊन हा साप जंगलात सोडला जाईल.- शंकर बारखडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा

टॅग्स :wildlifeवन्यजीव