शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

‘रेमडेसिवीर’चा अनावश्यक वापर नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 05:00 IST

जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून समन्वय ठेवण्यात येत आहे.  अनावश्यक वापर व काळाबाजार होऊ नये, यासाठी भरारी पथकही नेमण्यात आले आहे. सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत ठेवण्यात येत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी कोविडसुसंगत जीवन आत्मसात करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सर्व रुग्णालयांनीही रुग्ण व नागरिकांमध्ये प्रसारण, फलक आदी  माध्यमांतून जनजागृती करावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

ठळक मुद्देखासगी कोविड रुग्णालय संचालकांच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती  : खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा अनावश्यक वापर होता कामा नये. रेमडिसिविरच्या उपलब्धता व नियंत्रणासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मात्र, गरज नसेल तिथे अवाजवी वापर होणे चुकीचे आहे. याबाबत शासनाने वेळोवेळी प्रसृत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व रुग्णालयांकडून पालन व्हावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी दिले.जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, आ. सुलभा  खोडके,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते.जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून समन्वय ठेवण्यात येत आहे.  अनावश्यक वापर व काळाबाजार होऊ नये, यासाठी भरारी पथकही नेमण्यात आले आहे. सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत ठेवण्यात येत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी कोविडसुसंगत जीवन आत्मसात करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सर्व रुग्णालयांनीही रुग्ण व नागरिकांमध्ये प्रसारण, फलक आदी  माध्यमांतून जनजागृती करावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. 

डॉक्टरांनी करावे समुपदेशनकोरोना उपचारात रेमडेसिवीर हाच एकमेव रामबाण उपाय समजून खासगी डॉक्टर त्याचा अवाजवी वापर करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ते तत्काळ थांबावे. गरज नसलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडूनही रेमडेसिविरबाबत मागणी होत असेल, तर डॉक्टरांकडून त्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. सर्व रुग्णालयांना गरजेनुसार इंजेक्शन, ऑक्सिजन आदी बाबी उपलब्ध करून दिल्या जातील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

औषधांचा अवाजवी वापर थांबवा रेमडेसिविर, ऑक्सिजन, लस आदी सर्व बाबींची कमतरता भासू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मात्र, कोरोना संसर्गाच्या या काळात आवश्यक तिथेच औषधांचा वापर, अवाजवी वापर टाळणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व रुग्णालयांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसguardian ministerपालक मंत्री