शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी माणसाला मोबाईल देऊ नका, बॅंक खाते क्षणात होऊ शकते साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:16 IST

असाईनमेंट पान २ ची लिड अमरावती : अनोळखी माणसाने कॉल लावण्यासाठी मोबाईल मागितल्यास देऊ नका. कारण त्यातून फसवणुकीचे ...

असाईनमेंट पान २ ची लिड

अमरावती : अनोळखी माणसाने कॉल लावण्यासाठी मोबाईल मागितल्यास देऊ नका. कारण त्यातून फसवणुकीचे प्रकार वाढू लागले आहेत. काॅलसाठी दिलेल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या बॅंक खात्यातील रक्कम एका क्षणात नाहीशी अर्थात विड्रॉल केली जाऊ शकते. अशा फसवणुकीच्या घटनादेखील घडत आहेत. त्यामुळे अनोळखी माणसाला मोबाईल देऊ नका, बॅंक खाते क्षणात होऊ शकते साफ, असे आवाहन सायबर पोलीस करीत आहेत.

ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक

कॉल करण्यासाठी मोबाईल घेऊन : भाऊ, माझा मोबाईल डिस्चार्ज झालाय, अर्जंट कॉल करायचा आहे, असे सांगून तुमचा मोबाईल घेतला जाऊ शकतो.

वेगळी लिंक पाठवून

कॉलसाठी मोबाईल देण्याची विनंती करून क्षणात तुमच्या मोबाईलमध्ये लिंक पाठवून, ती ओपन करून ओटीपी मिळवून फसवणूक केली जाऊ शकते.

लॉटरी लागली आहे असे सांगून

लॉटरी लागली आहे, असे सांगूनदेखील मोबाईल घेतला जाऊ शकतो. लाॅटरी लागल्याची बतावणी करून ऑनलाईन फ्रॉडच्या घटना वाढल्या आहेत.

केवायसीसाठी आवश्यक आहे म्हणून

तुमचे बॅंक खाते आधारशी संलग्न नसल्याने केवायसी करायचे आहे, त्यासाठी लिंक पाठवून, त्यावर क्लिक करण्याचे सुचवून ओटीपी मागितला जाऊ शकतो.

ही घ्या काळजी

१) आपला मोबाईल अनोळखी व्यक्तिला देऊ नये. भरीस पडू नये अन् दिलाच तर तो नेमका काय करतो आहे, ते तपासा.

२) कुणाशीही ओटीपी शेअर करू नका. कॉलव्यतिरिक्त अन्य ॲप अनोळखी व्यक्तिला हाताळण्यास देऊ नका.

३) आपला ओटीपी कुठलीही बॅंक मागत नाही. त्यामुळे केवायसी, लॉटरी, रिवाॅर्ड लागल्याच्या भूलथापांना बळी पडू नका. सतर्क राहा.

ओटीपी शेअर करू नकाच

अनोळखी माणसाला मोबाईल देऊच नका. एखादवेळी माणुसकी म्हणून मोबाईल दिल्यास, तो कॉलव्यतिरिक्त आणखी काही करत तर नाही ना, याबाबत सावध राहा. ओटीपी मागून, क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत.

सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक,

सायबर पोलीस ठाणे