अमरावती : दरवर्षीच उन्हाळा लागला की रक्ताचा तुटवडा होतो. यंदा तर कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे वर्षभरापासून बंद असलेले कॉलेज व ग्रामीणमध्येही कोरोनाचे रुग्ण निघत असल्याने रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली आहे. यामुळे रक्तांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कोरोना लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदात्यांनी लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
कोरोना संसर्ग वाढण्यापूर्वी जिल्ह्यात भरपूर रक्तदान शिबिरे झालीत. रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये, यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी केले होते. त्यानंतर मात्र, रक्तदान शिबिरेही रोडावलेली आहेत, दिवसाला १० ते १५ डोनर मिळतात. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, पीडीएमसी, बालाजी व संत गाडगेबाबा अशा चार रक्तपेढी आहेत. या सर्व ठिकाणी डोनरची परिस्थिती सारखीच आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये दिवसाला ४० ते ५० रक्त पिशव्यांची मागणी आहे. याशिवाय सिकलसेल, अॅनेमिया, थॅलेसिमिया, प्रसुती व विविध ऑपरेशनमध्ये रक्तपिशव्या, रक्तघटक लागतात. त्यामुळे रक्ताच्या तुटवड्याची कमी ही शिबिरे भरुन काढतात, परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे रक्तदात्यांनी कोरोनाचे लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान करणे महत्त्वाचे आहे. कोरोना संसर्गाच्या धाकाने रक्तदाते अलीकडे पुढे यायला तयार नाही. प्रशासन, सामाजिक संस्थांच्या आवाहनानंतर रक्तदान शिबिराला मिळणारा प्रतिसाद आता कमी झालेला आहे व त्यामुळेच आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
पाईंटर
दररोज किती रुग्णांना दिली जाते लस : ६ ते ७ हजार
आतापर्यंत झालेले लसीकरण : ८०,८९६
जिल्ह्यातील रक्तपेढ्या :०४
बॉक्स
दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी करा रक्तदान
(१) रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रत्येकाने रक्तदान करणे महत्त्वाचे आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा जीव वाचतो. सध्या कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. यामध्ये लस घेतल्यानंतर व दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येणार असल्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करणे महत्त्वाचे आहे.
(२) कोरोना संसर्गामुळे यंदा कॉलेजेस बंद राहिली आहे. ग्रामीण भागातही आता संसर्ग वाढलेला आहे त्यामुळे रक्तदाते समोर येत नाही. रक्तपिशव्यांचा साठा पुरेसा नाही. अशा परिस्थितीत लसीकरणापूर्वी रक्तदान न केल्यास पुढे २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्याने रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन आहे.
कोट
जीवनात रक्तदान हेे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपन केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचतो. त्यामुळे आतापर्यंत चार वेळा रक्तदान केलेले आहे. लसीकरणानंतर रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे मी लसीकरणापूर्वी रुग्णाला डोनर म्हणून रक्तदान केलेले आहे.
- प्रसाद काळे,
अमरावती
कोट
दरवर्षीच उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा असतो. यंदा तर कोरोनाचा संर्सगच आहे. त्यामुळे शिबिरे झालेली नाही. डोनरही कमी मिळत आहे. याशिवाय पाझ्मा दात्यांनाही सातत्यानी फोन करावा लागतो. आता लसीकरण सुरू झालेले आहे व सूचनेनुसार लसीकरण करणाऱ्यांना २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्याने त्यापूर्वीच रक्तदान करणे महत्त्वाचे आहे.
- उमेश आगरकर,
संपर्क अधिकारी, इर्विन रक्तपेढी