शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

३१ दिवसांत २०४८ नागरिकांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:12 IST

सद्यस्थितीत कडक उन्हामुळे श्वानांना दिवसाचे तापमान असह्य वाटू लागल्याने सावलीचा आडोसा घेऊन वा नालीच्या साह्याने थंड जागेत अस्तित्व लपवून ...

सद्यस्थितीत कडक उन्हामुळे श्वानांना दिवसाचे तापमान असह्य वाटू लागल्याने सावलीचा आडोसा घेऊन वा नालीच्या साह्याने थंड जागेत अस्तित्व लपवून बसलेले असतात. अडचणीतून मार्ग काढतान अचानक त्यांना स्पर्श झाल्यास चिडून चावा घेतात. तसेच दिवसा झोप घेतल्याने रात्रीला ते जागे राहून भुंकताना दिसत आहे. शहरातील विविध भागात वर्दळीच्या मार्गावर कळपाने बसून भूंकताना दिसतात. काही भागात वाहनधारकाच्या अंगावर धावण्याची नवीन कलाच या श्वांनांनी अवगत केलेली आहे. अशा स्थितीत बेसावध असलेल्या वाहनधारकांना अचानक अंगावर श्वान धावल्यानंतर सावरताना वाहनावरील नियंत्रण बिघडून अपघाताच्या घटना घडत आहे. विशेष करून रात्री ९ ते ११ वाजता दरम्यान या घटना प्रकर्षाने घडत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. यावर महापालिकेच्या पशू संवर्धन विभागाने काही उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

बॉक्स

बाजार समिती पेपर विक्रेत्याला चावा

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी पेपर वाटण्याकरिता गेलेल्या एका युवकाला मागून श्वानाने चावा घेतल्याची घटना बुधवारी घडली. त्याने पँटच्या मागील खिशात पॉकीट ठेवल्यामुळे श्वानाच्या जबड्यात ते पॉकीटच आल्याने ते थोडक्यात बचावले. मात्र, पुन्हा त्या भागात पेपर वाटण्यास जाण्याचे धाडस त्यांनी केले नाही. त्यामुळे अशा श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

----

मार्च महिन्यात श्वान, सर्पदंशाच्या घटना

गावा सर्पदंश श्वानदंश

अंजनगाव सुर्जी -- ६७

चांदूर रेल्वे १ ५८

धारणी ४ १७०

तिवसा २ ३३

चिखलदरा - ६

धामणगाव रेल्वे १ २४

भातकुली १ ३९

वरूड २ १३२

चुरणी ९ ८

अमरावती ४८ १११२

नांदगाव खंडेश्वर १ ५८

चांदूर बाजार १ ५३

दर्यापूर - ५७

अचलपूर ५ १४९

मोर्शी ३ ८२

एकूण २४ २०४८

-------------------------

मोकाट श्वानांचा बंदोबस्त होणे गरजेचे

शहरात रात्रीच्या वेळी मोकाट श्वान कळपाने फिरतात. वाहनधारकांना जवळ येईस्तोवर खाली मान घालून काही तरी शोधत असल्याचे भासून गाफील स्थितीत अगदी जवळ येताच भूंकून चावा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भांबावलेले वाहनचालक एकतर श्वानाचे शिकारी होतात, नाहीतर अपघात करवून घेतात. त्यामुळे अशा मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी वाढीस लागली आहे.

कोट

चार वर्षांपासून शहरातील मोकाट श्वानांची नसबंदी कार्यक्रम राबविलेले नाही. केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार जून महिन्यापूर्वी श्वान उत्पत्ती नियंत्रण उपक्रम राबविला जाणार आहे. श्वानदंशाची तक्रार आल्यास आमचे पथक तेथे पोहचून उपाययोजना करीत आहे.

- सचिव बोंद्रे,

पशूसंवर्धन अधिकारी, महापालिका