शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रायबल’ घोटाळाप्रकरणी पोलिसांनी मागविली कागदपत्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 15:56 IST

आदिवासी विकास विभागात सन २००४ ते २००९ या कालावधीत योजनांमध्ये सहा हजार कोटींचा घोटाळाप्रकरणी दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

अमरावती -आदिवासी विकास विभागात सन २००४ ते २००९ या कालावधीत योजनांमध्ये सहा हजार कोटींचा घोटाळाप्रकरणी दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. आता पोलिसांनी दोषींविरूद्ध आरोपांची कागदपत्रे मागविली असून, नाशिक येथून ती जुळवाजुळव केली जात आहे.माजी न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेतील चौकशी समितीने सलग चार वर्षे ‘ट्रायबल’ घोटाळाप्रकरणी चौकशी करून ४७६ दोषींवर फौजदारी कारवाई प्रस्तावित केली आहे. यात नाशिक, नागपूर, ठाणे व अमरावती चार अपर आयुक्त क्षेत्रांतर्गत प्रकल्प काार्यलय स्तरावरील अधिकारी, कर्मचाºयांचा समावेश आहे. गायकवाड समितीने ज्यांचेवर दोषी असल्याचा ठपका ठेवला, त्यांचेशी निगडित मूळ अभिलेखे, कागदपत्रे स्कॅनिंग करून नाशिक येथील आयुक्त कार्यालयात पोलीस बंदोबस्तात ठेवली आहे. त्याकरिता २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात असल्याची माहिती आहे. अमरावती अपर आयुक्त क्षेत्रांतर्गत एसआयटीने ३५ दोषींविरूद्ध फौजदारी कारवाईसाठी नावे निश्चित केली आहे. यात धारणी, अकोला पोलिसात प्रत्येकी दोन गुन्हे यापूर्वीच नोंदविले आहे. तसेच नागपूर क्षेत्रांतर्गत ६७ दोषींवर गुन्हे दाखल होणार आहे. आतापर्यंत नागपूर क्षेत्रात पाच दोषींवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. परंतु, नाशिक व ठाणे अपर आयुक्त क्षेत्रांतर्गत दोषींवर गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया मंदावल्याने गत आठवड्यात आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून कानउघाडणी केली. मात्र, पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या दोषींविरूद्ध पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवली आहे. त्यामुळे अपर आयुक्त स्तरावरून पोलिसांना दोेषींविरूद्धची आवश्यक कागदपत्रे, मूळ अभिलेखे पाठविण्यास प्रारंभ झाला आहे. यापूर्वी वर्ग-१ आणि वर्ग-२ च्या दोषी अधिकाºयांना विभागीय चौकशीसाठी नोटीस बजावल्या होत्या. त्यापैकी नागपूर अपर आयुक्त क्षेत्रात पाच जणांनी खुलासा पाठविल्याची माहिती आहे.    मुंबई उच्च न्यायालयाकडून महिनाभर दिलासाआदिवासी विकास विभागात घोटाळाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने १० जुलै २०१८ रोजी सिव्हिल अप्लिेकशन क्रमांक ७५१५/२०१८ अन्वये सुनावणीदरम्यान दोषींवर गुन्हे, विभागीय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनाला दिले होते. मात्र, याप्रकरणी उच्च न्यायालयाने सुनावणी लांबणीवर टाकल्याने दोषींविरूद्ध कार्यवाहीसाठी महिनाभर दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पोलिसांनी दोषींविरूद्धच्या कारवाईने वेग घेतला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती