शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

डॉक्टरांचे महापालिकेला ‘इंजेक्शन’

By admin | Updated: November 15, 2014 22:39 IST

पेशाने डॉक्टर असलेले अमरावतीचे नवनियुक्त आमदार सुनील देशमुख यांनी शनिवारी महापालिकेत आढावा बैठक घेतली. ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’चे ब्रिद वाक्य असलेल्या महापालिकेत शासन

अमरावती : पेशाने डॉक्टर असलेले अमरावतीचे नवनियुक्त आमदार सुनील देशमुख यांनी शनिवारी महापालिकेत आढावा बैठक घेतली. ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’चे ब्रिद वाक्य असलेल्या महापालिकेत शासन निधीचा धुराळा आणि शहर स्वच्छतेची वाट लागत असल्याबाबत त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. चांगले काम करा, अन्यथा कामचुकार अधिकाऱ्यांची खैर नाही, असा कानमंत्रही देण्यास आमदार विसरले नाहीत.महापालिका आयुक्त कक्षानजीकच्या सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीला आयुक्त अरुण डोंगरे, उपायुक्त विनायक औघड, रमेश मवासी, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, मदन तांबकेर, सुषमा मकेश्वर, योगेश पिठे, राहुल ओगले, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, लेखापाल शैलेंद्र गोसावी, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, आरोग्य अधिकारी शामसुंदर सोनी, देवेंद्र गुल्हाणे, अजय जाधव, शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी, सा.बां. कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, प्रकाश देशमुख, गंगाप्रसाद जयस्वाल, गणेश कुत्तरमारे, वंदना गुल्हाने, दीपक खडेकार, पोपटकर, मंगेश जाधव, जीवन प्राधिकरणाचे अभियंता अरविंद सोनार, चेतवानी आदी उपस्थित होते. आ. देशमुख यांचे आयुक्त अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर आढावा बैठकीला प्रारंभ झाला. महापालिकेतील बांधकाम परवानगीसाठी सुरु असलेली आॅटो- डीसीआर आॅनलाईन प्रणालीची माहिती घेतली. जीवन प्राधिकरणची २४ तास पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक स्टँड पोस्ट, ४४ कोटींची नगरोत्थान योजना, नवीन वस्त्यांमध्ये पाईन लाईन पुरवठ्याची वस्तुस्थिती, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय योजनेच्या अमंलबजावणीत येणाऱ्या अडचणी, शहर विकास आराखडा, भुयारी गटार योजना, मलनिस्सारण व्यवस्था, सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानात केलेली विकास कामे, राजापेठ रेल्वे उड्डाणपूल निर्मिती, नवाथे येथील भुयारी मार्ग, रमाई घरकूल आवास योजना, शिवटेकडी व भीमटेकडी विकास कामे, शहर विकास आराखडा, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, ऐतिहासिक परकोटाचे सौदर्र्यींकरण, आरोग्य सेवा, सुविधा, दैनदिंन साफसफाई, सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी, दवाखान्यांमध्ये आरोग्य सुविधा, सिटी बस, सफाई कंत्राटदाराची जबाबदारी अशा विविध समस्या आणि प्रश्नांवर देशमुख यांनी मंथन केले. दरम्यान शासन निधीतून रस्ते डांबरीकरणाची कामे, साफसफाईवर होत असलेला अवाजवी खर्च, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, डेंग्यूवर उपाययोजना, भुयारी गटार योजनेच्या पूर्णत्वासाठी येणाऱ्या अडचणींवर मंथन केले. मागील पाच वर्षांत काय झाले, या खोलात जायचे नाही; मात्र ही आढावा बैठक कागदोपत्री नसून निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अन्यथा पुढच्या बैठकीत काही खैर नाही, ही आठवणदेखील सुनील देशमुख यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना करुन दिली, हे विशेष.