शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

‘त्या’ दाम्पत्यासह डॉक्टरांवरही फौजदारी

By admin | Updated: February 20, 2016 00:45 IST

आई मरण पावली असताना पैशाच्या लालसेपोटी ती जिवंत दाखवून तिच्या सेवानिवृत्तीचे चार लाख रुपये ...

गुन्हा दाखल : मृताच्या नावे उकळली रक्कमअमरावती : आई मरण पावली असताना पैशाच्या लालसेपोटी ती जिवंत दाखवून तिच्या सेवानिवृत्तीचे चार लाख रुपये सफाई कर्मचारी पती-पत्नीने उचल केल्याप्रकरणी शुक्रवारी फौजदारी दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गणेश ढेंढवाल, छाया ढेंढवाल या पती, पत्नीसह गोपाल जोशी या डॉक्टरवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पोलीस सूत्रानुसार, लक्ष्मी प्रेम ढेंढवाल या महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा मृत्यू १३ एप्रिल २०१३ रोजी झाला असताना त्यांचे सुपूत्र गणेश ढेंढवाल व सून छाया ढेंढवाल यांनी त्या जीवंत असल्याचे भासवून त्यांना मिळणारी सेवानिवृत्तीची रक्कम उचल केली. तसेच लक्ष्मी ढेंढवाल यांना पतीची मिळणारी सेवानिवृत्तीची रक्कम देखील उचलण्याचा प्रताप करण्यात आला. लक्ष्मी ढेंढवाल या जिवंत असल्याबाबतचे प्रमाणपत्र स्थानिक चिचफैल येथील रहिवासी जी. एस. जोशी यांनी दिल्याची माहिती निदर्शनास आली आहे. हा प्रकार लेखा विभागात पडताळणीच्या वेळी उघडकीस आला. गणेश व छाया ढेंढवाल यांनी मृत लक्ष्मी ढेंढवाल यांच्या नावे बँकेत सेवानिवृत्तीचे ४ लाख रुपये उचल केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिका व बडनेऱ्यातील बॅक आॅफ़ महाराष्ट्र शाखेची फसवणूक झाल्याप्रकरणी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात महापालिकेचे स्वास्थ अधिकारी अरुण तिजारे यांनी तक्रार दाखल केली. फौजदारी कारवाई आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. अरुण तिजारे यांच्या तक्रारीवरुन गणेश ढेंढवाल, छाया ढेंढवाल व डॉ. गोपाल जोशी यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. ठाणेदार शर्मा यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु करण्यात आला आहे.