शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात डॉक्टरांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 22:17 IST

वैद्यकीय व्यावसायिक सकलेचा दाम्पत्याच्या रुग्णालय व वाहनांच्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी गुरुवारी बंद पुकारला.

ठळक मुद्देनिधी ठाकरे मृत्यूप्रकरण : दत्तापूर पोलीस ठाण्यात निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : वैद्यकीय व्यावसायिक सकलेचा दाम्पत्याच्या रुग्णालय व वाहनांच्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी गुरुवारी बंद पुकारला. या प्रकरणातील आरोपींवर कारवाईच्या मागणीचे निवेदन दत्तापूर पोलीस ठाण्यात तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले.शहरातील अशोक व सारिका सकलेचा या वैद्यकीय व्यावसायिक दाम्पत्याच्या रुग्णालयात १२ वर्षाची चिमुकली बुधवारी दगावली. त्यासाठी सकलेचा यांनी केलेला चुकीचा उपचार जबाबदार असल्याचा रोष व्यक्त करीत ५० हून अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या जमावाने रुग्णालयाची तोडफोड तसेच तेथील साहित्याची व वाहनांची जाळपोळ केली. या घटनेमुळे वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली असल्याचे धामणगाव मेडिकल असोसिएशनने गुरुवारी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन (प्रीव्हेन्शन आॅफ व्हायलंस अँड डॅमेज आॅफ प्रॉपर्टी) अ‍ॅक्ट २०१० अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यामध्ये करण्यात आली.जाळपोळीच्या निषेधार्थ वैद्यकीय व्यावसायिकांनी दिवसभर बंद पाळला. जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच दत्तापूर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनावर धामणगाव मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष भरत पालीवाल, सचिव असित पसारी, आय.एन. अग्रवाल, पी.ए. राठी, ए.पी. भैया, डी.आर. गुप्ता, पी.एस. पाटील, एस.पी. राठी, आर.बी. वाटाणे, ए.एन. जगताप, एम.ए. जगताप, सी.ए. नागपुरे, विशाल डोफे, एल.एल. भुतडा यांची स्वाक्षरी आहे.७० जणांविरूद्ध गुन्हे दाखलडॉ. अशोक सकलेचा यांच्या रुग्णालयात तोडफोड व परिसरात जाळपोळ केल्याप्रकरणी ७० हून अधिक जणांविरुद्ध भादंविचे कलम ४५२, ४३५, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६, ३२३, ३०७ व १३५ बी.पी. अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दत्तापूर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निधीचे पार्थिव तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर कावली वसाड येथे अंतिम संस्कार करण्यात आले.