शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांची विभागीय चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:02 IST

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके यांनी माहिती अधिकारात त्रोटक व अपूर्ण माहिती दिल्याच्या मुद्द्यावर प्रवीण तायडे जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या आमसभेत चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी टाके यांच्या विभागीय चौकशीची मागणी सभागृहाला केली.

ठळक मुद्देझेडपी आमसभा : तायडे आक्रमक, देशमुखांचेही समर्थन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके यांनी माहिती अधिकारात त्रोटक व अपूर्ण माहिती दिल्याच्या मुद्द्यावर प्रवीण तायडे जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या आमसभेत चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी टाके यांच्या विभागीय चौकशीची मागणी सभागृहाला केली.प्रवीण तायडे यांनी मार्च महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना माहिती अधिकारात सन २०१२-१३ पासून आतापर्यंतची पदभरती संदर्भातील माहिती मागविली. नोव्हेंबर महिना संपताना माहिती देण्यात आली, तीही अपूर्णच! माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सन २०१२-१३ पासून आतापर्यंत किती शिक्षकांच्या पदभरतीस मान्यता दिली. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता घेतली होती का? २ मे २०१२ च्या शासन निर्णयानुसार पदभरती करण्यास मनाई आहे. असे असताना १३ संस्थांमध्ये १८ शिक्षकांची पदभरती कशी केली? या मुद्द्यांवर तायडे यांनी माहिती मागितली होती.सीईओंकडे पती-पत्नीची तक्रारहीशिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करावी, अशी तक्रार प्रवीण तायडे यांनी सीईओंकडे २२ नोव्हेंबर रोजी केली. भातकुली पंचायत समितीत शालेय पोषण आहार अधीक्षक असलेले टाके यांचे पती सचिन गुल्हाने यांच्याविरोधात गाडगेनगर, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल आहेत. या दाम्पत्यावर कारवाई करावी, गुल्हानेंची त्वरित बदली करावी, या मागण्या आहेत.