शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘त्या’ चिमुकलीसाठी डॉक्टर दाम्पत्य ठरले देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:48 IST

घरासमोर झालेल्या अपघातात चार महिन्यांची एकुलती चिमुकली दगावली. आभाळाएवढे दु:ख मनात असताना, सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत अमरावतीच्या डॉ. सावरकर दाम्पत्याने तिच्या स्मृतिदिनी एका चिमुकलीवर मोफत हृदयशस्त्रक्रिया करून समाजाला नवी दिशा दिलीे़

ठळक मुद्देवाघोलीच्या चिमुकलीला नवे आयुष्य

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : घरासमोर झालेल्या अपघातात चार महिन्यांची एकुलती चिमुकली दगावली. आभाळाएवढे दु:ख मनात असताना, सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत अमरावतीच्या डॉ. सावरकर दाम्पत्याने तिच्या स्मृतिदिनी एका चिमुकलीवर मोफत हृदयशस्त्रक्रिया करून समाजाला नवी दिशा दिलीे़अच्युत महाराज हार्ट हॉस्पीटलचे अध्यक्ष डॉ. अनिल सावरकर यांची नात म्हणजेच डॉ़ उमेश व अश्विनी सावरकर या दाम्पत्याची मुलगी मीरा ही घरासमोरील अपघातात आठ महिन्यांपूर्वी दगावली होती. परिवार दु:खात असतानाही त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत चार महिन्यांच्या मीराचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शासनाकडून परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने हा निर्णय बारगळला. तथापि, आठ महिन्यानंतर मीराच्या स्मृतिदिनी त्यांनी हृदयाला छिद्र असलेल्या वाघोलीच्या चार वर्षीय पायल पराते या चिमुकलीवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शासनाकडून कुठलीही मदत तिला मिळणार नव्हती व पराते कुुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिच्यावर संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये आठ दिवसांपूर्वी रूजू झालेले डॉ. सुपीत अन्नाधांडे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.पायलला मिळाला जगण्याचा आधारअचलपूर तालुक्यातील कुंभ वाघोली येथील पायल केशव पराते ही साडेचार वर्षाची चिमुकली. वजन व उंची वाढत नसल्याने आई-वडील चिंताग्रस्त होते. त्यात वारंवार न्यूमोनिया उद्भवत होता. तिच्या आई- वडिलांनी विविध चाचण्या केल्या असता, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. या चाचण्यांमध्ये तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे स्पष्ट झाले़ संत अच्युत महाराज हॉस्पिटलमध्ये उमेश सावरकर यांच्या आर्थिक मदतीने मीराच्या स्मृतीप्रीत्यर्थ मोफत शस्त्रक्रिया करून तिला नवे जीवन देण्यात आले. पायलचे वडील मजुरी करतात. सावरकर कुटुंबाने सामाजिक जाणिवेतून केलेली मदत आदर्शवत आहे.