मला अद्याप तक्रार प्राप्त झाली नाही. मात्र, तक्रार आल्यानंतर सदर प्रकरणाची तज्ज्ञ डॉक्टरची जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक
कोट
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पत्नीच्या पायाची बोटे कापावी लागली. त्यामुळे तिला कायमचे अपंगत्व आले. पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध गुन्हा नोंदवून याची नुकसानभरपाई द्यावी. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे.
प्रफुल्ल देशमुख, (रुग्ण महिलेचे पती)
कोट
अद्याप आम्हाला कुठलीही तक्रार प्राप्त झाली नाही. तक्रार आल्यानंतर ती आयएमएच्या कार्यकारिणी समितीसमोर ठेवण्यात येईल. त्यानंतरच या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाईची दिशा ठरविली जाईल.
डॉ. दिनेश ठाकरे, अध्यक्ष आयएमए
कोट
शासन निर्णयानुसार डॉक्टरविरुद्ध थेट गुन्हा नोंदविता येत नाही. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या समितीने चौकशी करून डॉक्टर दोषी असल्याचा अहवाल पोलिसांना सादर केल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.
- आरती सिंह, पोलीस आयुक्त
कोट
सदर महिलेची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. यापूर्वी पहिल्या बाळाच्या वेळीसुद्धा माझ्याचकडेच सिझेरियन झाले. यावेळी थंडीचेच दिवस असल्याने सिझेरिननंतर तिला थंडी वाजल्याने आयाबाईने रुमहिटर लावले. मात्र, त्या मूर्ख आयाबाईने हिटर महिलेच्या पायाजवळ ठेवल्याने तिचा पाय भाजला. याप्रकरणी त्या आयाबाईला काढून टाकण्यात आले. याबाबत मलाच तर वाईट वाटत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर मलाच या घटनेचा शॉक बसला. कुठल्याच डॉक्टरला आपल्या रुग्णांचे वाईट व्हावे, असे वाटत नाही. मी तर त्यांची फॅमिली डॉक्टर आहे.
- डॉ. संध्या काळे, स्त्रीरोगतज्ज्ञ