शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात डॉक्टरांचा मृत्यू, पाच जणांचा जखमी; वलगाव मार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 22:34 IST

अमरावती-वलगाव मार्गावरील कल्पदीप मंगल कार्यालयानजीक रहाटगाव रिंगरोडवर गुरुवारी सायंकाळी हा अपघात घडला.

अमरावती/पथ्रोट : पथ्रोट (ता. अंजनगाव सुर्जी) येथून अमरावतीला येत असलेल्या डॉक्टरांच्या कारपुढे आलेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात स्टेअरिंंग लॉक झाल्याने कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटली. या अपघातात एका डॉक्टरचा मृत्यू झाला, तर त्यांचे पाच सहकारी जखमी झाले. 

अमरावती-वलगाव मार्गावरील कल्पदीप मंगल कार्यालयानजीक रहाटगाव रिंगरोडवर गुरुवारी सायंकाळी हा अपघात घडला. डॉ. श्रीधर अडगोकार (६०, रा. पथ्रोट) असे मृताचे नाव आहे. जखमींमध्ये डॉ. संजय उत्तम तिखिले (५०), डॉ. घनश्याम गिल्डा (५८), डॉ. विश्वनाथ नारायण कविटकर (५८, सर्व रा. पथ्रोट) तसेच डॉ. विलास कविटकर (५५, रा. अंजनगावसुर्जी), डॉ. प्रभाकर टेहरे (६५, रा. परसापूर) यांचा समावेश आहे. 

एमएच २७ बीई ०१६१ क्रमांकाची कार चालवित असलेले डॉ. विश्वनाथ कविटकर हे गंभीर जखमी झाले. इतरांना किरकोळ जखमा आहेत. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सदर डॉक्टर पीडीएमसी हॉस्पिटल येथे व्यावसायिक कामासाठीचे अर्ज दाखल करण्यासाठी येत होते, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.

अमरावतीला पोहोचण्यापूर्वी वाटेतच हा अपघात झाला. डॉ. श्रीधर अडगोकार यांना हॉस्पिटलमध्ये आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आला. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

टॅग्स :Amravatiअमरावती