शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

उंटावरून शेळ्या हाकलू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:07 IST

नियोजनशून्य कारभार व समन्वयाच्या अभावामुळे शहरात निर्माण झालेली वाहतूक कोंडी कदापि खपवून घेणार नाही. कॅज्युअली घ्याल, तर मी अ‍ॅक्शन घेईन, काम पडल्यास फौजदारी कारवाईलासुद्धा सामोरे जावे लागेल.

ठळक मुद्देसुनील देशमुख : प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडसावले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नियोजनशून्य कारभार व समन्वयाच्या अभावामुळे शहरात निर्माण झालेली वाहतूक कोंडी कदापि खपवून घेणार नाही. कॅज्युअली घ्याल, तर मी अ‍ॅक्शन घेईन, काम पडल्यास फौजदारी कारवाईलासुद्धा सामोरे जावे लागेल. उंटावरून शेळ्या हाकलणे बंद करा. रस्त्यांवर उतरून कामे करा, अशा शब्दांत आ. सुनील देशमुख यांनी कंत्राटदारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावले.गुरुवारी पोलीस आयुक्तालयाच्या सभागृहात 'ट्रॅफिक जाम'विषयी झालेल्या धमासान चर्चेत आ. देशमुख यांनी प्रशासकीय अधिकाºयांनाही खडसावत कामकाजात सुधारण्याचे निर्देश दिले. यावेळी मंचावर आ. सुनील देशमुख, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, महापालिका आयुक्त संजय निपाणे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे उपस्थित होते. सोबतच पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव, प्रदीप चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त गोर्डे व पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे उपस्थित होते. आमदार सुनील देशमुख यांनी दिलेल्या वेळनुसार, सायंकाळी ४ वाजताच बैठकीला सुरुवात केली. वेळेनुसार बैठकीला उपस्थित राहण्याच्या सवयीचा त्यांनी आवर्जुन उल्लेखही केला.शहरातील 'ट्रॅफिक जाम' कशामुळे निर्माण होत आहे? जबाबदारी कोण, कोण जबाबदारी टाळत आहेत, कोण कामचुकारपणा करीत आहेत, याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांचीदेखील कानउघाडणी केली. वाहतूक पोलिसांनीही आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे, केवळ पावत्या फाडण्यात मग्न राहून चालणार नाही. याशिवाय वरिष्ठ अधिकाºयांनी केबीनमध्ये बसून वाहतुकीची समस्या सुटणार नसल्याचे ते पोलिसांना म्हणाले. याशिवाय आॅटोच्या मनमानी कारभारावर अंकुश लावण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. कंत्राटदारांच्या मनमानी कारभारावर त्यांनी ताशेरे ओढत कामात गती आणा, रात्रीतून कामे करा, असे निर्देश दिले. अतिक्रमणधारक हॉकर्सचा बंदोबस्त लावण्याच्या सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी सांभाळवून लोकांप्रती जागृत राहून काम करायला हवे, लोकांच्या समस्या दुर करण्याचे आवाहनही आमदार देशमुख यांनी यावेळी केले.- तर त्या पोलिसांवर कारवाई करूआ. सुनील देशमुख यांनी 'ट्रॅफिक जाम'विषयी बैठकीत पोलिसांसह पीडब्ल्युडी, महापालिका, जीवन प्राधिकरण, वीज वितरणाच्या अधिकाºयांना लोकांप्रतीच्या जबाबदारी समजावून सांगितली. या विषयावर बोलताना पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी पोलिसांची बाजू मांडत, आम्ही आमच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आमचे पोलीस कर्मचारी जर कामचुकारपणा करीत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करू, असे बाविस्कर म्हणाले. त्याचप्रमाणे महापालिका आयुक्तांनीही अतिक्रमणाच्या विषयी गंभीरतापूर्वक काम करण्याची ग्वाही दिली. पीडब्ल्युडी अधिकाºयांनीही लोकांना अडचण होणार नाही, या पद्धतीने कामे होईल, असे आश्वासन दिले.