शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांच्या’ घरी अजूनही आली नाही ‘उज्ज्वला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:13 IST

गरीब महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली.

ठळक मुद्देवऱ्हा येथील अपंग महिलेला न्याय केव्हा मिळणार? : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅससाठी धडपड कायम

आॅनलाईन लोकमततिवसा : गरीब महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. मात्र, तालुक्यातील वऱ्हा येथील एका दिव्यांग व भूमिहीन महिलेने या योजनेचा लाभ मिळण्यासाठी धडपड करूनही व्यर्थ गेल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रतिभा सुरेश उमप (रा.वऱ्हा) असे त्या शेतमजुरी करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिवसा तालुक्यातील अनेक खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. आजही गरीब महिला परंपरागत चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे वास्तव आहे. पूर्वापार चालत असलेल्या चुलीमध्ये ही लाकडे जळतण म्हणून वापरतात. धूर स्वयंपाक घरात कोंडत असल्यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. बीपीएल प्रमाणपत्रासह दहा प्रकारचे दस्तऐवज सादर करून गरीब महिलांना गॅस कनेक्शन मोफत दिले जाते. पण, शेगडी व इतर साहित्यासाठी दोन हजार रुपयापर्यंत रुपये खर्च करावे लागतात. पण, ही लोन प्रक्रिया त्रासदायक असल्याची माहिती आहे. याला काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले जात आहे.गॅस कनेक्शन मोफत देणारी सरकार कितीही गवगवा करीत असली तरी गॅस कनेक्शन घेतेवेळी महिलांना काही रुपये मोजावे लागतात, हे वास्तव आहे. त्यापुढे तर गॅस सिलिंडर घेण्यासाठी पैसा दयावाच लागतो. पावसाळ्यात सरपणासाठी परिसरातील शिवारात जावे लागते. तिवसा तालुक्यात सकाळी निघून लाकूड फाटे जमा करुन डोक्यावर आणणा?्या गरीब महिला आहेत. या महिलांना सरपणासाठी रानात जावे लागत आहे. त्यामुळे हिंस्रपशूंचा मोठा धोका संभवतो.